FD rate: ‘या’ बँका देतात ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर सर्वाधिक व्याज…
senior citizens -गेल्या काही वर्षांपासून ठेवीवरील व्याजदरात घट होत आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणुक म्हणून ठेवीला प्राधान्य.
FD rate up to 7.5% for senior citizens investing for ten years: गेल्या काही वर्षांपासून ठेवीवरील व्याजदरात घट होत आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देताना बँकामध्ये ठेवी ठेवतात. बँका इतर ठेवीदारांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अर्धाटक्के जास्त व्याज देतात. काही बँका अजूनही ज्येष्ठ नागरिकांना दहा वर्षांच्या मुदतीच्या मुदत ठेवींवर म्हणजे एफडींवर साडेसात टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. त्यात ठेवीची कमाल मर्यादा तीन कोटी इतकी आहे. या बँका कोणत्या आहेत ते या लेट्सअप मनीमध्ये जाणून घेऊया..
या यादीत स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देतात. या यादीत इक्विटास स्मॉल फायनान्स बँक पहिल्या क्रमांकावर आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा वर्षांच्या मुदतीच्य ठेवींवर 7.5 टक्के व्याजदर देत आहेत. तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा वर्षांच्या मुदतीच्या मुदत ठेवींवर 7.45 टक्के व्याजदर देत आहे. तर एयू स्मॉल फायनान्स बँक 7.25 टक्के व्याज देते. तर ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक 6.25 टक्के, तर जन स्मॉल फायनान्स बँक सात टक्के व्याज देते. तर शिवालिक व स्लाइस या दोन स्मॉल फायनान्स बँक पावणेसात टक्के व्याज देते. तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सात टक्के, तर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक सव्वासात टक्के व्याजदर देत आहेत.
बँक एफडीवरील व्याजावर टीडीएस कधी कापतात ?
बँकेतील मुदत ठेवीवरील एका वर्षाचे व्याज एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यावर त्यावर बँक टीडीएस लावते. टीडीएस हा अतिरिक्त कर नाही. तुम्ही तुमचा आयटीआर दाखल करून ते परत मिळवू शकते. तुम्ही जर कर परताव्यासाठी पात्र असाल, तर तुम्ही त्या परताव्यावरील व्याजासाठी पात्र ठरू शकतात. तर जेष्ठ नागरिकांना व्याजावरील टीडीएस घाबरू नये. ही कपात टाळण्यासाठी फॉर्म 15 एच सादर करता येतो. हा फॉर्म हा स्व-घोषणापत्र आहे. ज्येष्ठ नागरिकांनी हा फॉर्म दिल्यानंतर त्यांचा टीडीएस कपात केली जात नाही.
