BMC मध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार २५ हजार पगार

  • Written By: Published:
BMC मध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार २५ हजार पगार

BMC job for Sanitation Inspector : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. प्रत्येकजण सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होतेच असं नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्वच्छता निरीक्षक’ (Sanitation Inspector’)पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

आजची सुनावणी ही फक्त शिवसेनेबद्दल, पटेलांचा दावा आव्हाडांनी खोडला; म्हणाले, ‘ही एकत्रित सुनावणी…’ 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे. BMC लोकमान्य टिळक महापालिका जनरल हॉस्पिटल भर्ती 2023 आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती नोटीफिकेशनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – स्वच्छता निरीक्षक

एकूण पदांची संख्या – 10

शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच स्वच्छता निरीक्षक पदविका किंवा आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असावा
मराठीचे तोंडी व लेखी ज्ञान असणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता – T.M.S. रुग्णालयात/जावक विभागात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.ltmgh.com

पगार-
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपये पगार दिला जाईल.
वेतनाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळणार नाही

निवड –
उमदेवारांचे अर्ज आल्यानंतर त्यांच्या मुलाखती होतील. निवड झालेल्या उमेदवारांमधून दहा उमेदवारांच्या नेमणूका करून आणखीन पाच उमदेवार प्रतिक्षा यादी वर ठेवण्यात येतील. एका वर्षाच्या कालावधीत नेमलेल्या दहा उमेदवारांपैकी कोणीही सेवा सोडून गेल्यास प्रतिक्षायादीतील उमदेवारांमधून नेमणूका करण्यात येतील. ही नेमणूक केवळ तात्पुरत्या स्वरूपात असेल. उमेदवारास कोणत्याही प्रकारे नियमित कायम स्वरुपी नोकरीवर हक्क सांगता येणार नाही.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1rm6fp1pTkZWese0DVKQ-GBYkMtxb9m2E/view?usp=sharing

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube