वृद्धापकाळात ‘या’ योजनेचा आधार, घरही राहील अन् दरमहा पैसेही मिळतील; जाणून घ्या..

वृद्धापकाळात ‘या’ योजनेचा आधार, घरही राहील अन् दरमहा पैसेही मिळतील; जाणून घ्या..

Reverse Mortgage Plan : ज्या वयोवृद्ध लोकांना नियमित उत्पन्नाची आवश्यकता वाटते त्यांच्यासाठी रिव्हर्स मोर्गेज हा एक (Reverse Mortgage) चांगला पर्याय ठरू शकतो. वृद्धापकाळात जीवन कठीण असते. यावेळी पैशांची सर्वाधिक गरज असते. त्यात जर मुलगा आणि सुनेकडून त्रास होत असेल तर त्या घरात वृद्ध लोकांची खूप परवड होते. अशा प्रसंगी रिव्हर्स मोर्गेज सारखी योजना खूप फायदेशीर ठरते. या योजनेत जोपर्यंत ग्राहक आपले घर विक्री करत नाही, तो स्वतः घरातून निघून जात नाही किंवा त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत कर्ज फेडण्याची आवश्यकता नसते.

या योजनेत नियमितपणे पैसे मिळत राहतात. ही योजना 60 वर्षांवरील घरमालकांसाठी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या जोडीदारासह अर्ज करता येतो. यासाठी एकच अट आहे ती म्हणजे अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 55 वर्षे असावे. संपत्तीवर थकीत कर्ज किंवा अन्य कोणतेही देणे असता कामा नये. गहाण ठेवलेल्या संपत्तीचे आयुष्यमान 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यावर अर्जदाराला कमीत कमी तीन लाख आणि जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

संपत्तीवर कर्ज असेल तर अनपत्ति प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रोसेसिंग फी कर्जाच्या 0.50 टक्के असू शकते. खरंतर बँका कमीतकमी 2 हजार आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फी आकारू शकतात. बँक ग्राहकाच्या वयाच्या आधारावर कमाल 15 वर्षांपर्यंत कर्ज देते. ज्येष्ठ नागरिक कोणत्याही शुल्क पेनल्टी शिवाय रिव्हर्स मोर्गेज कर्जाचे प्रीपेमेंट करू शकतात.

दररोज फक्त 50 रुपये बचत करा अन् करोडपतीच व्हा; जाणून घ्या, मालामाल होण्याचं गणित

असेही काही फायदे

रिव्हर्स मोर्गेज खर्चाबरोबरच दैनंदिन खर्च, औषधोपचाराचा खर्च, प्रवासाचा खर्च यांसाठी देखील पैशांचा उपयोग करू शकतात. एकरकमी भरण्याव्यतिरिक्त पैशांच्या वापरावर कोणतेच बंधन नाही.

कर लाभ : आयकर कायदा 1961 चे कलम 10 (43) नुसार रिव्हर्स मोर्गेजचे पेमेंटला उत्पन्न मानले जात नाही. यामुळे कर भरण्यात सूट आहे. रिव्हर्स मोर्गेज फंडच्या माध्यमातून घराच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम कर वजावटीसाठी पात्र ठरू शकते.

कर्ज फेडण्याची गरज नाही

वृद्धापकाळात कर्ज फेडणे कठीण ठरू शकते. ग्राहकाच्या मृत्यूनंतर संबंधित बँकेला संपत्ती विकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कर्जदाराला कर्ज चुकते करण्याची काहीच गरज नाही. उच्च व्याजदराच्या कारणामुळे रिव्हर्स मोर्गेज कर्ज सर्वात महागडे मानले जाते. ही व्यवस्था जोपर्यंत घराचा मालक त्या घरात राहत आहे तोपर्यंतच फायदेशीर ठरू शकते.

घर मालक जर एक वर्षाहून अधिक काळ घरात राहत नसेल तर कर्जाची परतफेड करावी लागेल. बँक वयोवृद्ध व्यक्तीला बेघरही करू शकते असे आर्थिक सल्लागार सांगतात.

बापरे! Mobile App चोरताहेत तुमचा डेटा; Uninstall केल्यानंतरही सोडत नाहीत पिच्छा..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube