Video : लहान मुलांसाठी सोशल मीडिया किती धोकादायक?; मस्कने उदाहरण देत सांगितले सत्य
‘social Media Bad For Kids’ Says Elon Musk : एक्स प्लॅटफॉर्मचा सर्वेसर्वा इलॉन मस्कने लहान मुलांसाठी सोशल मीडिया किती धोकादायक आहे यावर भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी मस्कने याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत इशाराही दिला आहे. पॅरिसमधील VivaTech फेअरमध्ये मस्क ऑनलाईन सभागाई झाला होता. त्यावेळी त्याने ही चिंता व्यक्त केली आहे. यावेळी मस्कने मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी किती स्वातंत्र्य दिले पाहिजे यावर नियम तयार करणे गरजेवर असल्याचेही म्हटले आहे.
मस्कने सांगितले सोशल मीडियाचे तोटे
व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर मस्कने सोशल मीडियाचे तोटे सांगितले. मस्क म्हणाला की, सोशल मीडिया वापराचा मुलांना अधिक धोका असतो. कारण सोशल मीडिया कंपन्या यूजर्स सातत्याने या प्लॅटफॉर्मचा वापर करत रहावे यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा (AI) वापर करतात. परंतु, या तंत्रामुळे मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या ‘डोपामाइन’ रसायन वाढते. त्यामुळे पालकांनी मुलांना कमीत कमी सोशल मीडिया वापरण्याची किंवा पाहण्याची परवानगी दिली पाहिजे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या मेटा प्लॅटफॉर्मवरही त्यांनी टीका केली. या प्लॅटफॉर्ममुळे मुलांचे शोषण होत असल्याचे मस्क म्हणाला.
A lot of social media is bad for kids, as there is extreme competition between social media AIs to maximize dopamine! https://t.co/bzB8m5qL9z
— Elon Musk (@elonmusk) May 23, 2024
इलॉन मस्कने सोशल मीडियाचा मुलांवर होणाऱ्या प्रभावाबाबत बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दल मस्कने यापूर्वीही अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या WGS परिषदेत ते म्हणाले होते की, मी माझ्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यापासून कधीच रोखले नाही, ही माझी चूक होती. यात मस्कने सोशल मीडियाच्या अति वापरामुळे मुले त्याच पद्धतीने विचार करत असल्याचे मस्कने सांगितले होते.