राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Govt.Schemes : प्रत्येक वर्षी विद्यापीठ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती सुरु करते. त्यात ही शिष्यवृत्ती केवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाच्या इतर शिष्यवृत्तींपैकी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती महत्वाची असते. विद्यापीठाच्या नियमानुसार आपण कोणताही एकच अर्ज करु शकता.(Govt Schemes Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme)
सोमय्यांचा पाय खोलात! तो व्हायरल व्हिडिओ खरा, गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती
योजनेसाठी नियम व अटी :
– राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.
– राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी तुमच्या उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.
– राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी केवळ तुमची गुणवत्ता हाच निकष राहील.
– ही शिष्यवृत्ती तुम्हाला मागील परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक असेल.
– तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठी तुमचं पदवीचं वय 25 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमातील वय हे 30 पेक्षा अधिक नसावे.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा मिळेल?
तुमच्या गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ तर मिळणार. यामध्ये 48 टक्के तुमच्या गुणवत्तेनुसार योजनेचा लाभ असेल आणि 52 टक्के तुमच्या आरक्षणानुसार योजनेचा लाभ मिळेल. यामध्ये तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. तुम्ही तुमच्या नियमित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असला पाहिजे.
शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1 चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
2 मागील वर्षाचे मार्कशीट
3 आधार कार्ड
4 बँक पासबुक (आधार कार्डला लिंक असणारे)
5 कॉलेजचा तुमचा एलीजीबीलिटी नंबर
6 जातीचा दाखला
7. 75 टक्के उपस्थिती पत्रक
योजनेचा लाभ कसा होतो?
त्या-त्या विभागानुसार तुम्हाला 6000 ते 16000 शिष्यवृत्ती दिली जाते.