पोस्ट विभागात 8 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, महिन्याला 19900 रुपये मिळणार पगार

पोस्ट विभागात 8 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, महिन्याला 19900 रुपये मिळणार पगार

Indian Postal Department Recruitment 2023 : आजचं युग हे प्रचंड स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे तरुणांसमोरचं मोठं चॅलेंज आहे. कारण दिवसेंदिवस बेरोजगारांची ( unemployed) संख्या वाढ आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि  आठवी पास (8 th)असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे.  भारतीय डाक विभागाच्या मेल मोटार सेवा विभागाकडून कुशल कारागीर (skilled craftsman) पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. मेल मोटार सेवा कुशल कामागिरांच्या पदांसाठी पात्र इच्छूक उमेदवारांकडून अर्ज बोलावण्या आले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची ताऱीख 13 मे 2023 आहे. मेल मोटार सेवा भरतीसाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, याबाबतचा अधिक तपशील नोटीफिकेशमध्ये देण्यात आला आहे.

मेल मोटर सेवा भरतीसाठी पात्र उमेदवार त्यांचे अर्ज http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटद्वारे करू शकतात. मेल मोटर सर्विस मुंबई (इंडिया पोस्टल डिपार्टंमेंट मुंबई) भरती बोर्ड, मुंबई यांनी एप्रिल 2023 च्या जाहिरातीसाठी एकून 10 रिक्त पदांची घोषणा केली आहे.

अर्ज करतांना उमेदवारांनी आवश्यक ती सगळी कागदपत्रे अर्जासोबत जोडावे. कारण, अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास किंवा आवश्यक ती कागदपत्रे नसल्यास अर्ज अपात्र ठरेल. महत्वाचं म्हणजे, अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी एकदा संबंधित नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचावे. आणि त्यानंतरच अर्ज भरावा. कारण, अर्जात अनावधाने देखील कुठली त्रुटी राहिल्यास किंवा दिलेल्या तारखेनंतर अर्ज आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज हा रद्द होईल, याची नोंद असावी.

एकूण पदे – 10

पदाचे नाव – कुशल कारागीर
1. मेकॅनिर (मोटार व्हेईकल) – 3
2. मोटर व्हेईकल इलेक्ट्रीशियन – 2
3. वेल्डर – 1
4. टायरमन – 1
5. टिनस्मिथ – 1
6. पेंटर – 1
7. ब्लॅकस्मिथ – 1

शैक्षणिक पात्रता
संबंधित विषयात आयटीआय किंवा 8 वी पास
1 वर्षाचा अनुभव
मेकॅनिक पदासाठी जड वाहन चालक परवाना

वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 18 ते 30 वर्ष
ओबीसी – 3 वर्षाची सुट
मागासवर्गीय – 5 वर्षाची सुट

Sunil Kedar : जान जाए पर वचन न जाए, 50 खोक्यांचा विषयी कायमचा संपवायचा
शुल्क – नाही

पगार –  19900 (7 व्या वेतन आयोगानुसार)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

आवश्यक कागदपत्रे
1. वयाचा पुरावा
2. शैक्षणिक प्रमाणपत्रे
3. वाहन चालवण्याचा परवाना
4. जातीचा दाखला

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
वरिष्ठ व्यवस्थापक,
मेल मोटर सर्विस, 134-A,
सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – 400018

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1nT3YJYTS0pjEYU_g0qULk5odc_6n1-XX/view

● अर्ज करण्याची अंतिम तारीख -13 मे 2023
● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या –http://www.indiapost.gov.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube