International Left Handers Day : डावखुरा की उजवा, कोण जास्त हुशार? जाणून घ्या, इंटरेस्टिंग फॅक्टस्..
International Left Handers Day : आज आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस. डाव्या हाताच्या व्यक्तींची (International Left Handers Day) खासियत आणि वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. समाजात वावरताना आपल्या प्रत्येकाचीच कधीतरी डावखुऱ्या व्यक्तीची भेट झाली असेलच. या व्यक्तींबद्दल मनात कुतूहलही निर्माण झालं असेल. आपण उजव्या हाताने रोजची कामं जितक्या सफाईनं करतो तितकी ती आपल्याला डाव्या हाताने करता येत नाहीत. मात्र हीच काम डावखुरा व्यक्ती अगदी सहज आणि तितक्याच सफाईनं करतो. तसेच डावखुऱ्या व्यक्ती जास्त हुशार असतात की उजव्या हाताने काम करणाऱ्या असाही प्रश्न नेहमीच विचारला जातो चला तर मग तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तरही जाणून घेऊ या..
अमेरिकेतील एका संशोधनातून असे समोर आले आहे की आई वडील उजव्या हाताने काम करणारे असतील तर मुले डावखुरे होण्याची शक्यता 9 टक्के असते. आई वडिलांपैकी एक जण जर डावखुरा असेल तर मुले डावखुरे होण्याची शक्यता 19 टक्के राहते. जर आई-वडील दोन्ही डावखुरे असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारे मुल डावखुरे असण्याची शक्यता 26% असते
जगात डावखुऱ्या व्यक्तींची संख्या जवळपास 10 टक्के आहे. डावखुरे लोक अॅथलेटिक्स मध्ये उजव्या लोकांपेक्षा जास्त निपुण असतात. डावखुरे लोक पाण्याखाली उजव्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त चांगल्या प्रकारे पाहू शकतात. कारण डावखुऱ्या व्यक्तींचे डोळे अशा परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात. संशोधनातून असे समोर आले आहे की डावखुरे लोक मेंदूशी जास्त चांगल्या प्रकारे संपर्क स्थापित करू शकतात. मेंदूशी साधल्या जाणाऱ्या या ताळमेळमुळे डावखुऱ्या लोकांमध्ये कलात्मकता आणि प्रॉडक्टीविटी चांगली असते.
त्यावेळी फडणवीस साहेब जन्मालादेखील आले नव्हते; डोक्याला हात लावत भुजबळांनी दिलं उत्तर
मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या भागाला नियंत्रित करतो तर मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाला नियंत्रित करतो. मेंदूचा डावा भाग सृजनात्मक, इंट्यूशन आणि संगीताच्या ज्ञानाशी संबंधित असतो. म्हणून आपल्याला डावखुऱ्या कलाकार आणि विचारवंतांची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील.
पहिला लेफ्ट हँडर्स कधी साजरा झाला ?
उजव्या हाताने लिहीणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र डाव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तींसाठी आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे हा एक विशेष दिवस आहे. या दिवशी डाव्य हाताने काम करण्याचे फायदे, तोटे आणि वैशिष्ट्ये या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. त्याबद्दल जनजागृती केली जाते. लेफ्टहँडर्स इंटरनॅशनल सुरू करणारे डीन आर. कॅम्पबेल यांनी 1976 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता.
डावखुऱ्या व्यक्ती असतात जास्त स्मार्ट
उजव्या हाताच्या व्यक्तींच्या तुलनेत डाव्या हाताच्या व्यक्ती आधिक स्मार्ट असतात हे अनेकदा दिसून आले आहे. डावखुऱ्या व्यक्तींचा वाचनाचा वेग जास्त असतो. प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात असते. संगीत आणि कला क्षेत्रात आपल्या कल्पनाशक्तीचा सर्वाधिक वापर डावखुऱ्या व्यक्ती करतात. उजव्या हाताच्या व्यक्तींच्या तुलनेत डावखुऱ्या व्यक्तींची आकलन शक्तीही जास्त असते. कोणतेही काम परफेक्ट आणि सफाईने करण्यावर या व्यक्तींचा भर असतो.
‘गुम है किसी प्यार में’ मालिकेतील सावी-रजतच्या साखरपुड्याला सुप्रसिद्ध गायकाची खास उपस्थिती
जगात 7 ते 10 टक्के लोक डावखुरे
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जगातील फक्त 7 ते 10 टक्के लोक डावखुरे आहेत. या व्यक्ती आपली दैनंदीन कामे डाव्या हाताने करतात. पण, जगभरात उजव्या हाताच्या माणसांचाच भरणा असल्याने डावखुऱ्या व्यक्तींना कधीकधी समस्यांनाही सामोरे जावे लागते. कोणतीही वस्तू किंवा एखादे यंत्र तयार करताना उजव्या हातांच्या लोकांचा विचार केला जातो. तसेच समाजात आजही डावखुऱ्या व्यक्तींबाबत काही गैरसमज असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
लोक डावखुरे का असतात ?
काही अनुवांशिक कारणांमुळे एखादा व्यक्ती डावखुरा असू शकतो. मुलींच्या तुलनेत मुले जास्त डावखुरी असतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे हे होते. लहान वयातच मेंदूत झालेल्या सौम्य नुकसानीमुळे कदाचित असे घडू शकते असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र डावा हात आणि मेंदू यांच्या संदर्भात अशा कोणताही अधिकृत सिद्धांत अद्याप समोर आलेला नाही. पालकांकडून विशिष्ट प्रकारचा जनुक वारसा मिळालेला असतो. त्याला डाव्या हाताची जनुकं असे म्हणता येईल.