त्यावेळी फडणवीस साहेब जन्मालादेखील आले नव्हते; डोक्याला हात लावत भुजबळांनी दिलं उत्तर
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दीक वाद सुरू आहेत. त्यात आता जरांगेंनी भुजबळांवर बोलताना पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. फडणवीस हे भुजबळांना बोलायला लावत आहेत म्हणून तुम्ही बोलत असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी भुजबळांवर केला आहे. या आरोपांवर भुजबळांनी डोक्याला हात लावत उत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
ठरलं! विधानसभा निवडणुकीच्या मैदानात कुणाला उतरवायचं; फडणवीस करणार शिक्कामोर्तब
जरांगेंच्या आरोपांवर बोलताना भुजबळ म्हणाले की, मी आमदार झालो किंवा मुंबईचा महापौर झालो त्यावेळी मला असं वाटतं की फडणवीस साहेब जन्मालादेखील आले नसतील. त्यामुळे त्यांनी मला सांगवा अशी परिस्थिती अजून आलेली नाही असे म्हणत भुजबळांनी स्वतःच्या डोक्याला हात लावत सर्व काही ठिक आहे काळजी करू नका असे असे सांगितले. (Chagan Bhujbal Reaction On Sharad Pawar Maratha Reservation Comment)
मी शरद पवारांसोबत…पवारसाहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात; विनोद तावडे
पवारांच्या ऑफरवर भुजबळ म्हणतात ‘ओ माय गॉड’
आज (दि. 12) सकाळी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी (Sharad Pawar) मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असे विधान केले. तसेच या बैठकीत ओबीसी नेते मनोज जरांगेंनाही बोलवावे असे म्हटले. भुजबळ आणि जरांगेंनी एकत्र येऊन चर्चा केली तर, यातून मार्ग निघेल या प्रश्नवार भुजबळांनी थेट देवाचचं नाव घेतलं.
ते म्हणाले की, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या हे शिंदे, अजित पवार, भाजप, पवार साहेब, काँग्रेस, ठाकरे म्हणत नाही. प्रकाश आंबेडकर तर ओबीसी बाचव मोर्चाच घेऊन निघाले आहेत. त्यामुळे जरांगेंची ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीला मी हो म्हणणार आहे का? असा प्रतिप्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. त्यामुळे काय चर्चा करण्यात अर्थ आहे. प्रश्न उगिच इकडे तिकडे टोलवण्यात काही अर्थ नसून, हा राज्यातील 14 कोटी नागरिकांचा प्रश्न असल्याचे भुजबळ म्हणाले. राज्यातील शांतता बिघडली तर, ही बाब ना महायुतीला ना मविआला आवडेल असेही ते म्हणाले. पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, मी काहीच मागत नाहीये. मी फक्त माझं जे आहे ते घेऊ नका एवढीच माझी इच्छा आहे.
Video : पत्रकार परिषदेत ‘गुलाबी जॅकेट’वर प्रश्न; गुगली टाकत पवारांकडून अजितदादा ‘बोल्ड’
पवारांच्या आवाहनाला जरांगेचा विरोध
एकीकडे भुजबळांनी एकत्र येण्याच्या चर्चेवर थेट देवाचचं नाव घेतलं, तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी ठाम असलेल्या मनोज जरांगेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे म्हणाले की, सरकारला माहिती आहे आऱक्षण कसं द्यायचं? ते देत नाहीत. नुसती ढकलाढकली सुरु आहे. त्यामुळे चर्चेला बसण्याची गरज काय आहे ? असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांच्या एकत्र चर्चेला येणाच्या आवाहानाला विरोध केला आहे.