‘या’ लोकांनी पपई अजिबात खाऊ नये, जाणून घ्या

‘या’ लोकांनी पपई अजिबात खाऊ नये, जाणून घ्या

मुंबई : फळे हे नेहमीच शरीरासाठी फायदेशीर असतात. यातच पपई देखील अनेकांना आवडते व हे फळ बाजारात सहज उपलब्ध देखील होत असते. पपई ही खायला जेवढी गोड आहे तेवढीच तिचे फायदे देखील अमूल्य आहे. पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन, फायबर असे पोषक घटक आढळतात. त्वचेसाठी तसेच पोटाच्या समस्यांवर पपई फायदेशीर आहे.

पपई खाल्याने शरीराला फायदे मिळतात मात्र काही विशिष्ट परिस्थितीत पपई (Papaya Side Effects) खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई अजिबात खाऊ नये. साखरेची पातळी कमी असलेल्या लोकांनी पपई अजिबात खाऊ नये. असे केल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात. मधुमेहींनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपईचे सेवन करू नये.

तसेच गरोदरपणात पपई खाणे हानिकारक ठरू शकते. यामध्ये असलेले पॅपेन शरीरातील पेशींच्या पडद्याला हानी पोहोचवू शकते. म्हणूनच गर्भवती महिलांना पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

त्वचा ऍलर्जी : ज्यांना त्वचेची कोणत्याही प्रकारची ऍलर्जी आहे त्यांनी पपई खाणे टाळावे. याचे सेवन केल्याने शरीरावर लाल पुरळ उठणे, डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सूज देखील येऊ शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊनच तुम्ही पपईचे सेवन करावे

‘अजितदादा आम्ही घेत नाही सढळ हाताने मदत करतो’, मुख्यमंत्र्यांचा Ajit Pawar यांना टोला

काही लोक पपई खाल्ल्यानंतर लगेच औषध घेण्याची चूक करतात. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर पपई आणि शरीरातील रक्त पातळ करणारी औषधे यांचे मिश्रण करून कॉकटेल बनवता येते. त्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.

Nawab Malik आजारी असल्याचे कोर्टाला मान्य, वैद्यकीय कारणांसाठी जामिनावर होणार सुनावणी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube