खुशखबर! राज्य नगरपरिषदेत  1782 जागांसाठी बंपर मेगा भरती, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

खुशखबर! राज्य नगरपरिषदेत  1782 जागांसाठी बंपर मेगा भरती, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

Maharashtra Municipal Council Job : राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा मध्ये गट-क (श्रेणी अ, ब आणि क) मध्ये सुमारे 1782 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेद्वारे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. (Recruitment for 1782 seats in Maharashtra Municipal Council last date 20 August)

एकूण पदे – 1782

पदाचे नाव –
स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, मलनिस्सारण आणि स्वच्छता अभियंता, लेखापाल/लेखापरीक्षक, कर मूल्यांकन आणि प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक. वरील सर्व पदे गट-क (श्रेणी अ, ब आणि क) अंतर्गत आहेत.

शैक्षणिक पात्रता –
सिव्हिल इंजिनीअर – सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा + एमएस-सीआयटी किंवा समकक्ष.
इलेक्ट्रिकल अभियंता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा + MS-CIT किंवा समकक्ष.
संगणक अभियंता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा + MS-CIT किंवा समकक्ष.
पाणी पुरवठा जलनिस्सारण आणि स्वच्छता अभियंता – मेकॅनिकल/पर्यावरण अभियांत्रिकी डिप्लोमा + एमएस-सीआयटी किंवा समकक्ष.
लेखापरिक्षक /लेखापाल – B.Com + MS-CIT किंवा समकक्ष.
कर मूल्यांकन आणि प्रशासकीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समकक्ष.
अग्निशमन अधिकारी – कोणत्याही विषयातील पदवी + नागपूर येथून अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा उप-स्थानिक अधिकारी आणि अग्निरोधक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण + एमएस-सीआयटी किंवा समकक्ष.
सॅनिटरी इन्स्पेक्टर – कोणत्याही शाखेतील पदवी + सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये डिप्लोमा.

Chandrayan 3 चंद्राच्या जमिनीवर कायम स्वरूपी ठेऊन येणार भारताची ‘ती’ खास गोष्ट

वयोमर्यादा-
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय / अनाथ / EWS – 5 वर्षे सूट.

अर्ज फी –
खुला वर्ग – रु.1000.
मागासवर्गीय/अनाथ/EWS – रु.900.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.mahadma.maharashtra.gov.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube