Chandrayan 3 चंद्राच्या जमिनीवर कायम स्वरूपी ठेऊन येणार भारताची ‘ती’ खास गोष्ट

Chandrayan 3 चंद्राच्या जमिनीवर कायम स्वरूपी ठेऊन येणार भारताची ‘ती’ खास गोष्ट

Chandrayan 3 Launched : शुक्रवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक एक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. तर चंद्रावर पोहचल्यावर चंद्रायान एक भारतासाठी एक खास गोष्ट करणार आहे. काय आहे ही खास गोष्ट? पाहूयात… (Chandrayan 3 will print India’s Rajmudra on land of moon for life time )

‘ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी’… खातेवाटपानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेत फिरत-फिरत चंद्राकडे झेपवणार आहे. चांद्रयान-3 च्रंदावर 23 ऑगस्टला पोहचण्याची शक्यता आहे. जेव्हा त्याचं च्रंदावर सॉप्ट लॅन्डींग होईल आहे. डेटा गोळा करण्यासाठी ते काम करेल. त्याच वेळी ते चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचं राष्ट्रीय चिन्ह उमटवणार आहे.

काय सांगता… आता AI बाळाचा जन्म अमेरिकेत होणार, जाणून घ्या एआय बेबी म्हणजे काय?

चांद्रयान-3 च्या लॅन्डरमधून बाहेर निघाल्यावर रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचं राष्ट्रीय चिन्ह उमटवणार आहे. रोवरच्या मागच्या चाकावर हे भारताच्या राजमुद्रेचं चिन्ह जे सारनाथच्या अशोकस्तंभावरून घेण्यात आलेलं आहे. ते राजमुद्रेचं चिन्ह तयार करण्यात आलं आहे. ते चिन्ह रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर हे चिन्ह चंद्राच्या पृष्ठभागावर उमटवणार आहे. हे चिन्ह कायमस्वरूपी चंद्रावर तसंच राहणार आहे. या चिन्हाच्या चंद्रावर उमटण्यामुळे भारताचं यान चंद्रावर येऊन गेल्याचं पुढील कित्येक वर्ष पुरावा राहणार आहे.

या सर्व प्रक्रियेचा एक अॅनिमेटेड व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यावर काय-काय करणार हे दाखवण्यात आलं आहे. चांद्रयानाचं लॅन्डर चंद्रावर उतरल्यावर त्यातील रोवरची बॅटकी अॅक्टीव्ह होईल. सोलर पॅनल खुले होईल. रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्याचा कॅमेरा दुसरे भआग अॅक्टीव्ह होतील. तर हे रोवर लॅन्डरपासून 500 मीटरपेक्षा जास्त दूर जाणार नाही. त्याच वेळी ते भारतासाठी राजमुद्रेचं चिन्ह चंद्राच्या पृष्ठभागावर उमटवून खास गोष्ट करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube