मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये 42 पदांची भरती; 2,00,000 रुपये पगार

मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये 42 पदांची भरती; 2,00,000 रुपये पगार

Mumbai Municipal Corporation Recruitment : आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे हे महाकठीण काम आहे. कारण बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुण नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेतेतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ऑडिओलॉजिस्टच्या पदांच्या 42 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ. (Recruitment under Lokmanya Tilak Municipal General Hospital and Medical College in Mumbai Municipal Corporation)

एकूण पदांची संख्या– 42

पदाचे नाव –
वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट.

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पोस्टच्या आवश्यकतेनुसार आहे आणि तपशीलवार माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा –
वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, – 60 वर्षे.
इतर पदांसाठी खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे.

अर्जाची पद्धत – ऑफलाइन

अमित ठाकरेंच्या ‘या’ कृतीमुळे मनसैनिक चिडले थेट पोस्टरचं फाडले 

वेतन – पदानुसार पगार 25 हजार ते 2 लाखाच्या दरम्यान असेल

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

वेबसाइट – http://www.ltmgh.com

अर्ज फी –
वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार – रु. 580 + GST.
कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट – रु.291 + GST.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार –
डिस्पॅच सेक्शन, तळमजला, कॉलेज कॅन्टीन जवळ, लोकमान्य टिळक नगर मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई – 400022.

कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट –
लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय, महाविद्यालयाची इमारत, तळमजला, रोख विभाग, खोली क्र. 15

महत्त्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2023

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube