दहावी आणि पदवीधरांसाठी आनंदीची बातमी; स्टाफ सिलेक्शनतंर्गत 2 हजाराहून अधिक पदांची भरती

दहावी आणि पदवीधरांसाठी आनंदीची बातमी; स्टाफ सिलेक्शनतंर्गत 2 हजाराहून अधिक पदांची भरती

SSC Selection Posts Bharti 2024 : तुम्ही नोकरीच्य (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (Staff Selection Commission) विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे तब्बल 2,049 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळं उमेदवारांनी वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करावेत, ही खरोखरच एक मोठी सुवर्णसंधी आहे. दरम्यान, या भरतीच्या तपशीलाविषयी जाणून घेऊ.

पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप करंडक’ : साई पॉवर हिटर्स संघाने सलग दुसऱ्यावर्षी पटकावली ट्रॉफी 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2024 आहे. इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवारांनी या तारखेपूर्वीच अर्ज करणे आवश्यक आहे. कारण उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही घालण्यात आली आहे. पोस्टानुसार वयाची अट लागू आहे.

रिक्त पदांची नावे आणि तपशील-

या भरती अंतर्गत लॅब अटेंडंट, लेडी मेडिकल अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फील्डमॅन, डेप्युटी रेंजर, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, लेखापाल, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफीसर ही पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण / 12वी उत्तीर्ण / पदवीधर उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा-
01 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षांच्या दरम्यान असावे. यामध्ये SC/ST श्रेणीसाठी 05 वर्षे वयाची सवत आहे, तर ओबीसी प्रवर्गासाठी वयात 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण
मध्य प्रदेश, पूर्व प्रदेश, कर्नाटक, केरळ प्रदेश, मध्य प्रदेश उप-प्रदेश, उत्तर पूर्व प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तर पश्चिम उप-प्रदेश, दक्षिण क्षेत्र आणि पश्चिम क्षेत्र.

अर्ज फी
सामान्य/ओबीसी: रु 100
SC/ST/PWD/EX SM/महिला: कोणतेही शुल्क नाही

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करा

महत्त्वाच्या तारखा
1) एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 ऑनलाइन अर्ज – 26 फेब्रुवारी 2024
2) अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
3) ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2024
4) संगणक आधारित परीक्षेची तारीख (पेपर-I) – 6, 7 आणि 8 मे 2024

follow us
  • fb
  • instagram
  • youtube