Hindenburg Report : अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका, हिंडेनबर्ग प्रकरणी मीडियाला…

Hindenburg Report : अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका, हिंडेनबर्ग प्रकरणी मीडियाला…

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत भर पडताना दिसून येत आहे. यातच आता अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाने जोरदार धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाच्या मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका देखील कोर्टाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले की, आम्ही माध्यमांवर बंदी घालू शकत नाही. आम्ही आमचा निकाल देऊ. यामुळे अदानी समूहाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

काय होती याचिका?
अदानी समूहाच्या वतीने याचिका दाखल करणारे अॅड एमएल शर्मा यांनी याचिकेत म्हंटले होते की, जोपर्यंत हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन होत नाही तोपर्यंत माध्यमांच्या कव्हरेजवर बंदी घालावी. शर्मा म्हणाले होते की, या प्रकरणी एक समिती स्थापन करावी लागेल, जी हिंडेनबर्ग अहवाल हा कटाचा परिणाम आहे की नाही याची चौकशी करेल. यानंतरही अदानी समूहाबाबत मीडियामध्ये सातत्याने बातम्या येत आहेत. या बातम्यांमुळे लाखो गुंतवणूकदारांना फटका बसत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे न्यायालयाचा आदेश येईपर्यंत प्रसारमाध्यमांना थांबवावे, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.

Ahmednagar Crime : केडगाव हादरलं! बायपास रोडवर गोळीबारात एकाचा मृत्यू

दाखल याचिकेवर कोर्टाचे म्हणणे काय?
अदानी समूहाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील युक्तिवाद फेटाळून लावत सरन्यायाधीश म्हणाले, न्यायालय माध्यमांना रिपोर्टींग करण्यापासून थांबवू शकत नाही आहे. कोर्टाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा आपला निर्णय राखून ठेवला आहे. तो लवकरच सुनावला जाईल.

Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
24 जानेवारी रोजी, हिंडेनबर्ग या यूएस-आधारित शॉर्ट सेलर कंपनीने अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनसारख्या गंभीर आरोपांसह अनेक आरोप करणारा अहवाल जारी केला. यानंतर श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी यांची घसरण सुरु झाली. ही घसरण त्यांना थेट 20व्या स्थानावरूनही खाली घेऊन आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube