Naseem Khan Resign : काँग्रेसला पुन्हा धक्का; नसीम खान यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

Naseem Khan Resign : काँग्रेसला पुन्हा धक्का; नसीम खान यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

Naseem Khan Resign : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) मोठा धक्का लागला आहे. काँग्रेस नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे.

माहितीनुसार, काँग्रेसने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी आमदार नसीम खान नाराज झाले होते. यामुळे त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. या मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा होती.

मात्र काँग्रेसने सर्वांना धक्का देत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. राजकीय वर्तुळात काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात नसीम खान यांच्यासोबतच भाई जगताप आणि अन्य काही नावांची चर्चा होती.

नसीम खान यांनी या प्रकरणात भाष्य करताना म्हणाले, पक्षाकडून मला तयारी करायला सांगितली होती, मात्र अचानक काय झाले की, पक्षाने मला उमेदवारी नाकारली. मला तयारी करायला सांगितली होती. मात्र, अचानक काय झालं मला माहित नाही. माझी नाराजी आहे. असं देखील नसीम खान यांनी म्हटले आहे.

राज्यात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही, पक्षाला मुस्लिम समाजाचे मतदान पाहिजे मग उमेदवार का नाही, असा सवाल नसीम खान यांनी केला. या मतदारसंघात मला प्रचार करायचा की नाही याचा निर्णय मी घेईल, माझी जी नाराजी आहे ती मी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहे असं देखील नसीम खान म्हणाले.

पंतप्रधान मोदी घाबरले, त्यांच्या डोळ्यातून स्टेजवर अश्रू येतील, राहुल गांधींनी लावला टोला

यामुळे आता नाराज नसीम खान यांची नाराजी काँग्रेस आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वर्षा गायकवाड कशी दूर करणार हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube