काही भोंग्यांकडून दररोज सकाळी जनतेची दिशाभूल; दादा भुसेंची राऊतांवर टीका

काही भोंग्यांकडून दररोज सकाळी जनतेची दिशाभूल; दादा भुसेंची राऊतांवर टीका

Dada Bhuse Criticize Sanjay Raut in PM Modi meeting : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये नाशिक आणि धुळे मतदार संघाचा समावेश आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी महायुतीचे उमेदवार भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्यासाठी नाशिकमध्ये प्रचार सभा घेतली. त्यावेळी मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

मुंबईतील मोदींच्या रोड ‘शो’मध्ये राज ठाकरे दिसणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट

यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले की, ही निवडणूक आपल्या देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. मात्र दुर्दैवाने काही भोंगे दररोज सकाळी नऊ-दहा वाजता टीव्ही समोर येऊन दिशाभूल करणारी वक्तव्य करतात. त्यामुळे अनेक चांगल्या बाबी दुर्दैवाने जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या भोंग्यांच्या खोट्या विषयांना बळी पडू नका. असं म्हणत भुसे यांनी राऊतांवर टीका केली.

अर्ज मोदींचा पण, पॉलिटिक्स काका-पुतण्याचं; उमेदवारीच्या गर्दीतला किस्साही खास..

त्याचबरोबर आतापर्यंत जे काही मतदान पार पडलं. त्या ठिकाणी विशिष्ट लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. या गोष्टीची खबरदारी तुम्हा सगळ्यांना घ्यावी लागेल. तुम्हाला देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करायचे आहेत. असं आवाहन यावेळी मतदारांना दादा भुसे यांनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज