कृषी कायदे मागे घ्यावे लागल्याने मोदी शेतकऱ्यांचा सूड घेताहेत; पृथ्वारीज चव्हाणांचा हल्लाबोल

कृषी कायदे मागे घ्यावे लागल्याने मोदी शेतकऱ्यांचा सूड घेताहेत; पृथ्वारीज चव्हाणांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan On Modi : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींव (Narendra Modi) जोरदार टीका केली. मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवल्याची टीका चव्हाण यांनी केली.

दिंडोरीची जागा माकपला सोडा, अन्यथा स्वतंत्रपणे लढू…; जेपी गावितांनी वाढवलं मविआचं टेन्शन 

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांनी मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा एखादा दहा वर्ष सत्तेत राहतो आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा त्या सरकारने आपल्या दहा वर्षाच्या कामाचा अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. या सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. पण, त्यांच्या कामाचा अहवाल मांडत नाहीत. ते फक्त 2004 ते 2014 या कालखंडाबद्दल बोलतात. मात्र, 2014 ते 2024 या कालखंडाबद्दल बोलत नाही. नरेंद्र मोदींच्या 10 वर्षात किती विकास झाला? किती अधोगती झाली? 2014 मध्ये दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण झाली नाहीत, अशी टीका चव्हाण यांनी केली.

अनेकांना संसदरत्न मात्र शिरूरच्या खासदारांकडून त्याचं भांडवल; आढळरावांची कोल्हेंवर टीका 

पुढं बोलतांना ते म्हणाले, मोदी सरकार आश्वासन पूर्ण करू शकले नाही. 2014 मध्ये मोदी म्हणाले होते… 100 दिवसांत परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा टाकू. पण, निवडून आल्यानंतर तो जुमला होता असं मोदींनी सांगितलं. मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजे दहा वर्षांत 20 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. मात्र हे आश्वासनही विद्यमान सरकार पूर्ण करू शकलं नाही, असं चव्हाण म्हणाले.

मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवलं
मोदी सरकारने कोणाशीही सल्ला न घेता शेती कायदे केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं शेती कायदे मागे घ्यावे लागले. यामुळे मोदी सरकारचा अपमान झाला आणि आता ते निर्यात बंदीमुळं शेतीमालाचे भाव पाडलेत. नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा सूड घेत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज