संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणं गरजेचं; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणं गरजेचं; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Prithviraj Chavan on PM Narendra Modi : भाजपने (BJP) चारशे पारचा नारा दिल्यानं भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलू शकते,अशी भीती विरोधकांनी व्यक्ती केली आहे. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींव (Prime Minister Narendra Modi) घणाघाती टीका केली आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणे गरजेचे आहे, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

कृषी कायदे मागे घ्यावे लागल्याने मोदी शेतकऱ्यांचा सूड घेताहेत; पृथ्वारीज चव्हाणांचा हल्लाबोल 

देशावर 206 लाख कोटीचं कर्ज
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांनी मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळं दहा वर्षात अर्थव्यवस्था मंदावली आहे. मोदी मान्य करत नाहीत. ते पाठ थोपटून घेतात, पण, देशावर 206 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, असं चव्हाण म्हणणाले.

तू कोणाला जॅक, टॉमी देऊन नोकरी लागली का?, मल्हार पाटलांची ओमराजेंवर घणाघाती टीका 

मोदींच्या काळात अर्थव्यवस्था मंदावली
पुढं बोलतांना ते म्हणाले, नोटाबंदीमुळे आतंकवाद संपेल, असं मोदी म्हणाले होते. मात्र, तो संपला नाही. मोदींनी काळा पैसा परत आणू, 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याची आश्वासने दिली. ती दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे आता दिलेली आश्वासने मोदी सरकार कशी पूर्ण होणार? असा थेट सवाल चव्हाण यांनी केला.

ते म्हणाले, भारत सरकारकडे काळ्या पैशाची माहिती आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मोदींकडे कागदपत्रे असताना कारवाई झाली नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केलं.

पुढं बोलतांना ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी ऑपरेशन कमल केलं. आमदार आणि खासदारांची खरेदी-विक्री झाली. त्यांच्यासोबत आमदार गेले. मात्र मतदार गेले नाहीत. नरेंद्र मोदी हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणे गरजेचे आहे, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज