ज्यांनी साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला; शिर्डीत आदित्य ठाकरेंनी तोफ धडाडली
Aaditya Thackeray On BJP : ज्यांनी साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला असल्याचं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सत्ताधाऱ्यांवर तोफ धडाडली आहे. शिर्डीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
Amruta Fadnavis: ‘मेरे राम…’ अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का? नेटकरी म्हणाले…
आदित्य ठाकरे म्हणाले, कोणी कितीही नारा दिला तरीही भाजप चारशेपार नाहीतर तडीपार होणार आहे. देशात सध्या हेच वातावरण दिसत आहे. साऊथ में साफ अन् नॉर्थ में हाप ही भाजपची सध्याची स्थिती त्यांनी हातानेच आणली आहे. 2014 पासून ते 2024 पर्यंत जनतेने भाजपला मतदान केलं. शिवसेनाही सोबत होती, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. 25 वर्षांपूर्वीची भाजप वेगळी होती, पण ज्यांना आपण साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार…, भाजपने पवार कुटुंबात भांडणे लावली; पटोलेंची जहरी टीका
तसेच दक्षिण भारतात ‘अब की बार’ भाजप तडीपार आहे. देशातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटकातही हीच स्थिती असून मध्य भारतात बिहारमध्ये तेजस्वी यादव मोठी लढाई लढत आहेत. बिहारमध्ये नितीश कुमारांनी पलटी मारली आहे. ते भाजपसोबत गेले आहेत. बिहारच्या जनतेने 2014 ते 2024 मध्ये अनेकांनी भाजपला मतदान केलं आहे. भाजपने बिहारच्या जनतेला अऩेक आश्वासने दिली पण एकही रुपयांचं भाजपने काम केलं नसल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
झारखंडमध्ये हेमंत सोरेन लोकांसाठी चांगलं काम करीत होते. हेमंत सोरेन यांचा पक्ष इंडिया आघाडीला चांगल्या जागा मिळवून देऊ शकतो, याची भीती भाजपला असल्यानेच त्यांना धमकावलं गेलं आहे. आमच्यासोबत या नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू अशी धमकी हेमंत सोरेन यांना देण्यात आली, पण सोरेन यांनी ठणकावून सांगितलं की जेलमध्ये जाईन पण भाजपसोबत येणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर कोणताही आरोप नाही आज ईडी सांगते की ते शुगर लेव्हल वाढवण्यासाठई जेलमध्ये आंबे खात आहेत. सत्य बोलणाऱ्या नेत्यांची अशी अवस्था भाजप करत असेल तर उद्या तुमच्या घरात येऊन तुम्हाला हे कपडे घालण्यास मज्जाव करतील, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.