वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढणार
Varsha Gaikwad will contest Lok Sabha : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसला पुन्हा धक्का, राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रा करणारा नेता भाजपमध्ये
The Central Election Committee has approved the candidature of Smt. Varsha Eknath Gaikwad as Congress candidate to contest the ensuing general elections to the Lok Sabha from 29-Mumbai North Central Parliamentary constituency of Maharashtra. pic.twitter.com/WcIJoqkyoj
— INC Sandesh (@INCSandesh) April 25, 2024
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी काँग्रेस आणि भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नव्हते. त्यामुळं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता. या जागेवर काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. कारण, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही मते वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नसीम खान यांच्यासोबतच भाई जगताप आणि अन्य काही नावांची चर्चा होती. मात्र आता कॉंग्रेसने वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले आहे.
साहेब म्हणाले मी राजीनामा देतो, तुम्ही बघा.. मी म्हणलं बघतो… त्यात माझं काय चुकलं?
खरे तर वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातूनही निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. मात्र, दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड यांची काहीशा नाराज झाल्या होत्या. त्यानंतर आता गायकवाड यांना तिकीट देऊन कॉंग्रेसने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जातो. अनिभेते सुनील दत्त हे या मतदारसंघातून पहिल्यांदा 1984 मध्ये निवडून आले होते. सलग तीन वेळा या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते.
महायुतीकडून कोणाला मिळणार तिकीट?
2005 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर या जागेवर भाजप खासदार पूनम महाजन यांनी सलग दोनदा विजय मिळवला होता. मात्र, आता वरिष्ठांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, तक्रारी, सर्वेक्षण अहवाल यामुळे महाजन यांना भाजपने अद्याप उमेदवारी दिली नाही. त्यामुळं वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुती कोणता उमेदवार उभा करणार याकडे लक्ष लागले आहे.