शिवराज्यभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्याचे मुनगंटीवारांचे निर्देश
350th Chhatrapati Shivaji Maharaj coronation ceremony at Raigad; Sudhir Mungantiwar conducted a review meeting : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याला (Coronation ceremonies) 350 वर्षे होत आहेत. तरी त्या सोहळ्याचे महत्त्व तेवढेच आहे. तमाम मराठी माणसांसाठी ही एक महत्त्वाची घटना आहे. हा सोहळा तिथीप्रमाणे 2 जून तर तारखेप्रमाणे 6 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या 350 व्या ऐतिहासिक शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील, अशा पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे शिवराज्यभिषेक सोहळा आयोजनच्या पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आढावा घेताना मंत्री मुनगंटीवार बोलत होते. शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका सर्व लोकप्रतिनिधींना देण्याच्या सूचना करीत सोहळ्याचे निमंत्रण प्रत्येक मान्यवरांना द्यावे. निमंत्रण पत्रिकेवर सर्व कार्यक्रमांची माहिती असावी. त्याचा क्यु आर कोड असावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित वारस, घराणे यांना वैयक्तिक स्तरावर निमंत्रण द्यावे, असे निर्देश मुनगंटीवर यांना दिले.
Earthquake: जपानमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, जीवित वा वित्तहानी नाही
मुनगंटीवार म्हणाले, रायगडावर सोहळ्यावेळी पाण्याची, स्वच्छतेची व गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच आरोग्याची सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची पर्याप्त व्यवस्था ठेवावी. गडावर माहितीसाठी फलकांची व्यवस्था करावी. सोहळ्यादरम्यान 1 ते 6 जून पर्यंत आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती एकत्रितरित्या रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच शिवराज्यभिषेक कार्यक्रमावर आधारीत डाक तिकिट अनावरणाची तयारी करावी, अशा सूचना त्यंनी दिल्या.
मुनगंटीवार म्हणाले, की रायगड हे उर्जाकेंद्र आहे. त्यामुळे येथील कार्यक्रम दिमाखदार व ऐतिहासिक झाला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग करून उपाय योजना कराव्या. पार्किंग स्थळ येथून गडाच्या पायथ्यापर्यंत राज्य परिवहन बसेसची व्यवस्था करावी. बसेसचे मागील काळात थकीत असलेली रक्कम देण्याची कार्यवाही करावी. गडावर इंटरनेटची सुविधा करावी. जेणेकरून जगभर सोहळा थेट प्रक्षेपण करून दाखविता येईल, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.
या बैठकीला आभासी पद्धतीने आमदार भरत गोगावले, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष राजे संभाजी छत्रपती उपस्थित होते, तर सभागृहात सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे-पाटील, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, सांस्कृतिक कार्यचे संचालक बी. एम चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, शिवराज्यभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते.