मोठी बातमी – बीडमध्ये भीषण दुर्घटना, भाविकांची बोट उलटून 50 जण बुडाले

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बोटीला गोदावरी नदीपात्रात भीषण अपघात झाला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 27 1

50 people drowned after a boat capsized : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बोटीला गोदावरी नदीपात्रात भीषण अपघात झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास 50 ते 60 भाविक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिक, बोटचालक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावलारी सुरू असून काही भाविकांना बाहेर काढण्यात यश आले आले आहे. अजून देखील उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.

सध्या पवित्र अशा अधिक मासानिमित्त बीडच्या माजलगाव तालुक्यामधील पुरुषोत्तमपुरी येथे राज्यभरातून लाखो भाविक भक्त दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. त्यामुळे याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील गोदावरी नदीपात्रातून भाविकांना बोटीच्या साहाय्याने प्रवास करावा लागतो. जास्त पैसे मिळावेत या हव्यासाने येथील बोटचालक अधिकचे प्रवासी या बोटीत भरतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्याने यापूर्वी देखील अनेक अपघात झाल्याच्या बातम्य समोर आल्या आहेत. त्यात आजची अजून एक दुर्घटना समाविष्ट झाली आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! BKC मध्ये दर शुक्रवारी कार, बाईकवर बंदी, मेट्रो-बसने प्रवासाचे आवाहन

बोटचालकांच्या या निष्काळजीपणामुळे आज गोदावरी नदीत बोट उलटून मोठा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेतून आतापर्यंत २० भाविकांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले असून बचावपथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन अजून देखील सुरू आहे. या अपघातात अनेक लहान मुलं देखील अद्याप बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यातून या अपघाताची गंभीरता लक्षात येते. बोटीत अंदाजे ६० भाविक प्रवास करत होते. त्यातून 20 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले असून इतर बेपत्ता भाविकांचा शोध सुरू आहे.

follow us