कुस्तीचा महासंग्राम, माती आणि गादी विभागातील विजेते आज भिडणार; महाराष्ट्र केसरी किताबासाठी निर्णायक क्षण
प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज अंतिम टप्प्यात पोहोचली असून बहुप्रतीक्षित अंतिम सामना संध्याकाळी रंगणार आहे.
A defining moment for the Maharashtra Kesari title : राज्यातील कुस्तीप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज अंतिम टप्प्यात पोहोचली असून बहुप्रतीक्षित अंतिम सामना संध्याकाळी रंगणार आहे. या थरारक लढतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्या पैलवानाला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता या रोमांचक अंतिम लढतीला सुरूवात होईल.
अनेक दिवस चाललेल्या अटीतटीच्या झुंजीनंतर आता अंतिम फेरीतील पैलवान निश्चित झाले आहेत. माती आणि गादी या दोन्ही विभागांतून सर्वोत्तम कारागिरी करणाऱ्या मल्लांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीच्या सिकंदर शेख यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही मल्लांची ताकद आणि अनुभव पाहता ही लढत अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
आमच्या पोलिसांचं अभिनंदन! पण नाशिकच्या पोलिसांचे.., खरात प्रकरणावर काय म्हणाले मंत्री विखे पाटील?
तर गादी विभागात सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सद्गिर यांनी प्रभावी खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता या दोन्ही विभागांतील विजेते पैलवान एकमेकांसमोर उभे ठाकणार असून महाराष्ट्र केसरी किताबासाठीची अंतिम लढत रंगणार आहे. गाडी विभागात जय पाटील याने आपले वर्चस्व स्पष्टपने सिद्ध केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत अकोल्याचा सिद्धांत गवई गैरहजर राहिल्याने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याला थेट विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर जय पाटील याने साताऱ्याच्या दिग्विजय जाधववर एकतर्फी 10-0 असा विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आणि अंतिम फेरीत धडक मारली.
दरम्यान नांदेडच्या शिवराज राक्षे आणि कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांच्यातील लढत विशेष चर्चेचा विषय ठरली. दोन्ही अनुभवी मल्ल आमनेसामने आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहिल्या फेरीत पृथ्वीराज पाटील याने 10-4 अशी आघाडी घेतली होती आणि अखेरपर्यंत ती कायम राखत 10-6 असा विजय मिळवत शिवराज रक्षेला स्पर्धेबाहेर केले. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते अंतिम सामन्याकडे. महाराष्ट्र केसरी किताब कोण पटकावणार, याची उत्सुकता राज्यभरातील कुस्तीप्रेमींमध्ये शिगेला पोहोचली आहे.