फुटबॉलचा सामना सुरू असतानाच मैदानात खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; काय आहे प्रकरण?

Kolhapur Football : फुटबॉलचा सामना सुरू असतानाच कोल्हापुरातील मैदानात खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये (Kolhapur) ही हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर मैदानात मोठ्या प्रमाणात एकाचवेळी गर्दी झाली. अखेर ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काल रविवार उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही घटना घडली. या घटनेमुळे कोल्हापूर फुटबॉल वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा अंक कायम; परळी तालुक्यात एकजणाचा दगडाने ठेचून खून, प्रकरण काय?
या घटनेनेचे जे फुटेज समोर आले आहेत त्या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहे. नेमकी कुठल्या कारणाने ही घटना घडली. मात्र, पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील सामन्यामध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंनी धुसमुसळा खेळ करत असताना अचानक मैदानावर मारामारीची घटना घडल्याने फुटबॉल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
यावेळी फक्त खेळाडूंमध्येच नाही तर समर्थकांमध्येही राडा झाला. त्यामुळे हुल्लडबाज समर्थकांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे पोलिसांनी मैदानावरील तणाव आणि हुल्लडबाजीची दखल घेत पोलीस पुढील कारवाई करत आहे.