रूग्णांवर मंत्रोच्चार अन् झाडपाला; खरातनंतर संगमनेरमध्ये स्वत: ला दत्तधाम सरकार म्हणणारा भोंदू जेरबंद
Dattadham Sarkar arrested संगमनेरमधील वडगावपान या परिसरामध्ये असलेल्या राजेंद्र बापू गडगेच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.
A fraudster who called himself Dattadham Sarkar was arrested after Kharat in Sangamner : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये आणि ठिकाणी भोंदू बाबाची प्रकरण उघडकीस येऊ लागले आहेत. यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये असाच एक भोंदू बाबा पोलिसांनी जेरबंद केला आहे.
स्वत: ला दत्तधाम सरकार म्हणणारा भोंदू जेरबंद
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील वडगावपान या परिसरामध्ये असलेल्या राजेंद्र बापू गडगे हा आपल्याकडे दैवी शक्ती आहे. मंत्र उच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करायचा. यासाठी तो स्वतःचा दत्तधाम सरकार नावाने यूट्यूब चॅनलवर दरबार चालवायचा. यातून तो सर्वसामान्यांची फसवणूक करत होता. मात्र संगमनेर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.
नाशिक SIT ची मुंब्य्रात फिल्मीस्टाइल रेकी! पती सापडला, निदा खान निसटली आता ॲट्रॉसिटीही दाखल
या तपासामध्ये समोर आला आहे की, हा भोंदू लोकांकडून उपचार करण्यासाठी 15 हजार, 21 हजार, 51 हजार रुपयांची रक्कम घ्यायचा. उपचाराच्या नावाखाली झाडपाला देऊन रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात होता. तो गेल्या दहा वर्षांपासून अशाप्रकारे लोकांच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक छळ करायचा.
यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्यसचिव ॲड. रंजना गवांदे यांनी या प्रकरणी फिर्यादी त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता गडगेसह त्याची मुलगी डॉक्टर मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गडगेसह मधुकर शिंदे दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच याचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलीसांनी सांगितलं.