धक्कादायक! बायकोला गाडीखाली चिरडून मारलं, बारामतीच्या कुटुंबातील घटना

घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा दाखल करण्यात आला.

Barramati

बारामती येथील हे दाम्पत्य दर्शनासाठी (Murder) कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात गेले होते. गाणगापूरकडे प्रवासादरम्यान बल्लुरगी गावाजवळ पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने रागाच्या भरात पत्नीला धावत्या कारमधून खाली ओढले आणि रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर अंगावरती गाडी घालून चिरडलं, त्यामध्ये त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

हा गंभीर प्रकार पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. काही वेळ नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार काही स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. नागरिक तिथे असेपर्यंत आरोपी शांत असल्याचं भासवत होता. मात्र, नागरिक बाजूला होताच त्याने क्रूरतेचं टोक गाठलं.

भीती, अंधश्रद्धा आणि फसवणुकीचं जाळं; अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे, 10 गुन्हे नोंद

मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या पत्नीवर आरोपी पतीने थेट कार चढवली. अत्यंत अमानुषपणे कार खाली चिरडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन या २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातील माहितीनुसार, ही घटना केवळ रागाच्या भरात घडलेली नसून ती पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

follow us