भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, कारला धडक देत चालकाला बेदम मारहाण
Brizza car Accidents in Kalyan : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण चर्चेत असताना आता कल्याणमध्ये तशीच काहीशी पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. (Pune Accident) एका अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिली. (Accident) इतकंच नाही तर आपल्या मित्रांना बोलावून कारचालकाला बेदम मारहाण करत, गाडीची तोडफोडही केली आहे.
मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अल्पवयीन मुलाचे वडील हे भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास पोलीस सुरवातीला विलंब करत होते. यानंतर कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची ‘टी 20’मधून निवृत्ती
कल्याण अटाळी गावात ही मध्यरात्री अल्पवयीन मुलगा ब्रिझा कार घेऊन कल्याणवरून अटाळी येथे असलेल्या आपल्या घरी जात होता. अटाळी चौकात रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या किया कारला अल्पवयीन मुलाने धडक दिली. या धडकेनंतर वाद निर्माण झाला. या वादात मुलाने कारचालकाला बेदम मारहाण करत गाडीची तोडफोड केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने फोनव्दारे संपर्क करून काही गुंड मित्र बोलवून घेतलं. आणि किया कारमध्ये असलेल्या वाहन चालकाला बेदम मारहाण केली.
गंभीर बाब म्हणजे ही घटना मध्यरात्री उशिरा घडली. मात्र, कल्याण खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तक्रारदार नसल्यामुळं गुन्हा दाखल केला नाही, असं सांगण्यात आलं. या अपघाताची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवर स्वतः गुन्हा (सुओ मोटो) दाखल करून तपास सुरू केला आहे.