Video : रस्त्याच काम पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच ट्रक पलटी, व्हिडिओ व्हायरल

Video : रस्त्याच काम पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच ट्रक पलटी, व्हिडिओ व्हायरल

Wadhwani Truck Overturn Video : बीड जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील खडकी इथं सध्या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. (Beed) या कामाच्या पाहणीसाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच एका ट्रकला अपघात झाला. या विचित्र अपघातात अभियंता आणि त्यांच्यासोबत पाहणीसाठी तिथं उपस्थित असलेले गावकरी थोडक्यात बचावले.

खरं तर, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांनी थेट ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’च्या विभागीय कार्यालयात जाऊन तक्रार केली होती. पुलाचं काम सुरू असल्यानं त्या ठिकाणी पर्यायी रस्ता करून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीनंतर संबंधित अभियंत्यांनी “मी स्वतः येऊन पाहणी करतो आणि कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देतो,” असं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनानुसार आज (9 जुलै) अभियंता पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, याचवेळी अचानक एक ट्रक या रस्त्यावरून जात असताना खाली कोसळला.

ट्रक अचानाक खाली आल्यानं एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी वेळीच पळ काढल्यानं मोठा अनर्थ टळला. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

तु आता तुझ्या बापाला घेऊन ये; बीडच्या सावकार अन् व्यावसायिकाची रेकॉर्डिंग व्हायरल

वडवणी तालुक्यातील खडकी परिसरात ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’ अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचं आणि पुलाचं काम सध्या सुरू आहे. मात्र या कामादरम्यान पर्यायी रस्ता न केल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच ठप्प झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका स्थानिक विद्यार्थ्यांना बसत आहे. गेल्या 8 दिवसांपासून खडकी परिसरातील विद्यार्थ्यांची एसटी बस विशेषतः मुलींसाठी असलेली मानव विकास योजनेतील बस या मार्गावर येत नाही, कारण रस्ता बंद असून दुसरा मार्ग उपलब्ध नाही.

परिणामी, विद्यार्थ्यांची नियमित शाळा बुडत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावकरी, पालक व विद्यार्थ्यांनी संबंधित कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्यांना वारंवार मागणी केली होती की, पुलाचं काम सुरू असताना पर्यायी रस्ता करून द्यावा. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी थेट बीड येथील पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातच शाळा भरवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या