Abdul Sattar पाहणी दौऱ्यावरून मागे फिरताच ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा!

Abdul Sattar पाहणी दौऱ्यावरून मागे फिरताच ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा!

नाशिक : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे गारपीट, अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर पाहणी करण्यासाठी ते पोहोचले. पण, त्यांनी शेतकऱ्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना मागे फिरावे लागले. अब्दुल सत्तार मागे फिरताच शेतकऱ्यांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके भुईसपाट झाली आहेत. द्राक्ष बागा, कांदा पीक, सोयाबीन सह भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच संपामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे होण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच त्रस्त झाले आहेत. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी असताना ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले देखील नाही. तसेच ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. दररोज ते शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट करत असल्याने त्यांच्याबाबत शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

Raj Thackeray : सौदीत भोंगे बंद होतात… मग भारतात मोदी का करत नाही?

नाशिक दौऱ्यात निफाड तालुक्यात रात्रीच्या अंधारात तुम्ही नक्की काय पाहिले, असा सवाल थेट अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांनी विचारला. मात्र, सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. त्यांनी शेतकऱ्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. तसेच अब्दुल सत्तार यांनी गांभीर्याने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणीच केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube