विधीमंडळाच्या अधिवेशनात आता सर्वसामान्यांना नो एन्ट्री! कारण…

विधीमंडळाच्या अधिवेशनात आता सर्वसामान्यांना नो एन्ट्री! कारण…

Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) तीन व्यक्तींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तींनी संसदेत मोठा राडा केल्याचंही समोर आलं आहे. परिणामी संसदेच्या कामकाजात व्यथ्यय आल्याने सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. त्यानंतर आता विधी मंडळातही सतर्कता बाळगण्यात आली आहे. नागपुर हिवाळी अधिवेशनात (Winter Session) गॅलरी पासेस देणं बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना अधिवेशनात नो एन्ट्री असणार आहे.

पन्नूने आठवड्याभरातच धमकी खरी ठरवली? देशाच्या संसदेवर ‘गॅस’ अ‍ॅटॅक?

विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहातील प्रेक्षक गॅलरीमध्ये पासेस देण्यात बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारुन स्मोक बॉम्ब धुर सोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधिमंडळाने तात्काळ निर्णय हा घेतला असून आमदारांना दोन पासेस दिले जातील तीन पास दिले जाणार नाही, अशी माहिती विधान परिषद उपासभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिली आहे.

Mahadev Betting App : मोठी बातमी! ‘महादेव अ‍ॅप’च्या मालकाला दुबईत अटक; भारतात आणणार

नेमकं काय घडलं?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी दुपारी 1.01 वाजता घडली. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल हे लोकसभेत कामकाज चालवत होते. तर, मालदा उत्तरचे भाजप खासदार खगेन मुर्मू हे विचार मांडत होते. त्याचवेळी अचानक दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. यामुळे एकच खळबळ उडली. या गोंधळाच्या वातावरणात काही खासदारांनी धाडस दाखवत अज्ञाताना घेराव घातला. त्यावेळी तरुणाने बुटाच्या आतून काहीतरी पदार्थ बाहेर काढले जो फवारल्यानंतर सभागृहात पिवळा धूर पसरला. सभागृहात घूसणाऱ्या व्यक्ती म्हैसूरच्या येथील खासदाराच्या नावाने दिलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीने आत आल्याचे सांगितले जात आहे.यातील एका व्यक्तीचे नाव सागर असल्याचे समोर आले आहे.

‘पेन्शनसाठी सत्ताधाऱ्यांना टेन्शन द्या, मी मुख्यमंत्री असतो तर’.. कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरून ठाकरेंचा निशाणा

दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून खासदार आणि मंत्री ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी उड्या मारल्या. त्यावेळी उपस्थित खासदारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तर तिसरी व्यक्तीने वरील बाजूने त्याच्याकडील गॅसचा फवारा मारला. यामुळे काहींनी डोळ्यांची जळजळ होत असल्याचे तक्रार केली असल्याचं काँग्रेस खासदारांकडून सांगण्यात आलं आहे. संसदेच्या आत तिघे घुसल्यानंतर खळबळ उडालेली असतानाच संसदेच्या बाहेर दोघांनी घोषणाबाजी करत स्मोक कँडल जाळली. हे स्मोक कँडल जाळणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचतील तरूणाचा समावेश होता ज्याचे नाव अमोल शिंदे असल्याचे चौकशीतून समोर आले असून, तो लातूरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube