‘पेन्शनसाठी सत्ताधाऱ्यांना टेन्शन द्या, मी मुख्यमंत्री असतो तर’.. कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरून ठाकरेंचा निशाणा
Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे (Maharashtra Winter Session) सुरू असतानाच जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) आंदोलनही सुरू झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जुनीच आहे. आता या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट देत पाठिंबा दिला. मी मुख्यमंत्री असतो तर तुमची मागणी नक्कीच पूर्ण केली असती. तसेच पेन्शनसाठी सरकारमधील लोकांना टेन्शन द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिवेशनावर मोर्चा नेला. या मोर्चात सहभागी होत उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा व्यक्त केला. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे जर दुर्लक्ष होत असेल तर सरकारला टेन्शन देण्याची वेळ आली आहे. आमचे सरकार आले तर कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
Uddhav Thackeray : ‘महागाई वाढणार, मग त्यात विशेष काय?’ उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल
दोन महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांचे नेते मला भेटले होते. त्यावेळी मी आंदोलनाला पाठिंबा देईल असे वचन त्यांना दिले होते. आता मी खोटं बोलणार नाही. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आमच्यासमोर पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विषय आला त्यावेळी आम्ही तो निर्णय घेतला.
गद्दारांनी गद्दारीनं सरकार पाडलं नाहीतर..
मी मुख्यमंत्री असताना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा सुरू करण्यात आली होती. पण, गद्दारांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं. जर मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला हा मोर्चा काढावाच लागला नसता. सरकारकडून फक्त घोषणा केल्या जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्ही (सरकारी कर्मचारी) करता. तरी देखील इतक्या महत्वाच्या घटकाला जर मागण्यांसाठी आक्रोश करावा लागत असेल तर आणि गद्दारी करून स्थापन झालेलं सरकार त्याकडे कानाडोळा करत असेल तर मग आत त्यांना टेन्शन देण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : अमित शहांवर येणार निवडणूक बंदी? बाळासाहेबांच्या कारवाईचा दाखला देत ठाकरेंनी घेरलं
आज मी मुख्यमंत्री नाही. माझा पक्ष आणि चिन्ह चोरलं आहे. मुख्यमंत्री असतो तर तुमची मागणी नक्कीच पूर्ण केल असती. पण आज काहीही नसताना तुम्हाला विश्वास आणि ताकद द्यायला आलो आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.