गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचे फोन; नागपूरात पोलीस सतर्क

  • Written By: Published:
गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचे फोन; नागपूरात पोलीस सतर्क

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन आले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार आज सकाळपासून दोन वेळा नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन आले आहेत. या नंतर गडकरी यांच्या कार्यलयाकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात पोलीस सतर्क झाले आहेत.

नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत. याच नावाने गडकरी यांच्या कार्यलयात याच्या आधीही एकदा कॉल आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचे कॉल आल्याची माहिती दिली आहे. पण नक्की कोणी फोन केले याची माहिती समोर आली नाही.

खासदार सुजय विखेंची माणुसकी! रस्त्यात बंद पडलेल्या कारला स्वत: दिला धक्का…

याआधीही आली होती धमकी

गडकरी यांच्या कार्यालयात याही आधी धमकी देण्यात आली होती. त्यावेळीगडकरींच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचं नाव जयेश पुजारी असून तो हत्या प्रकरणात बेळगाव तुरुंगामध्ये कैदेत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो तुरुंगातून पळून गेला होता. त्याशिवाय त्यानं तुरुंगातूनच अशाच पद्धतीनं अनेकदा मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे.

गडकरींच्या कार्यालयात दिलेल्या धमकीमागं एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे की, अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागं आहेत? याचा तपास पोलीस करताहेत. पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकमधील तुरुंगातून असे गैरप्रकार सुरु असल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्यात.

पंकजा मुंडेंना थेट पंतप्रधान व्हायचयं?; परळीतील विधानानं चर्चांना उधाण

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube