एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही

एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही

Agriculture Minister Abdul Sattar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने बळीराजाच्या संकटात भर घालण्याचे काम एकप्रकारे केले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. दरम्यान कृषिमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वास कृषिमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दणका दिल्यानंतर बळीराजा हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच मंत्री सत्तार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा येथील वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अवकाळीसह झालेल्या गारपिटीमुळे चितोडा आणि हिंगणा कारेगाव येथे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री सत्तार हे थेट शेताच्या बांधावर गेले होते. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावे.

म्हणून राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने भाजपाच्या मंत्र्यांला भाषणापासून रोखले

तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सत्तार यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांना मदतीचे आश्वासन दिले. तर राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत असेही ते म्हणाले.

बाबरी पडली तेव्हा अयोध्येत बाळासाहेब व शिवसैनिक नव्हते, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

बळीराजाच्या झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचीही उपस्थिती होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube