हॉटेलमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकली धाड; अहिल्यानगरमधील खळबळजनक प्रकार

हॉटेलमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकली धाड; अहिल्यानगरमधील खळबळजनक प्रकार
Ahilyanagar Crime News Prostitution In hotel : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar) एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी धाड टाकून तीन महिलांची सुटका केलेली आहे. अहिल्यानगर तालुका पोलिसांनी दौंड रोडवरील खंडाळा शिवारात हॉटेल राजयोगवर छापा टाकून कुंटणखाण्यावर कारवाई (Prostitution In hotel) केली आहे. या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु होता. यावेळी देहविक्री करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात (Crime News) आले आहे. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.
पोलिसांची कारवाई
पोलीस पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की, अक्षय अनिल कर्डिले नावाचा व्यक्ती अहिल्यानगरमधील हॉटेल राजयोग, खंडाळा येथे महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवत आहे. तपास पथकाने ही माहिती पोनि/राजेंद्र इंगळे, एएचटीयु, अहिल्यानगर यांना दिली. त्यानंतर तपास पथक पोनि/राजेंद्र इंगळे यांच्यासह कारवाई करण्यासाठी रवाना झाले.
तपास पथकाने हॉटेल राजयोग, खंडाळा येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले. हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पथकाने पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकला नारायण ठाणप्रसाद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पंधराशे रूपये रोख रक्कम मिळाली.
महिलांची सुटका
ताब्यातील आरोपी नारायण ठाणप्रसाद भटुराई याच्यासह हॉटेल राजयोगची तपासणी करता हॉटेलमधील रूममध्ये 03 महिला मिळून आल्या. या महिलांकडे विचारपुस करता त्यांनी अक्षय अनिल कर्डिले याने त्यांना वेश्याव्यवसायाकरीता आणल्याचे सांगुन, ग्राहकाकडून पैसे घेऊन, त्यामधुन आम्हास काही पैसे देतात. काही पैसे त्यांचेकडे ठेवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर त्यांची उपजीविका चालत असल्याची माहिती सांगीतली. पथकाने या महिलांची सुटका केलेली आहे. पथकाने पंचासमक्ष हॉटेल राजयोग, खंडाळा आरोपी अक्षय अनिल कर्डिले याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एक लाख रूपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपींमध्ये अक्षय अनिल कर्डिले, नारायण ठाणप्रसाद भटुराई यांचा समावेश आहे. ते तीन महिलांकडून कूंटणखाना चालवून त्यावर उपजीविका करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्याविरोधात नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube