बीड पुन्हा चर्चेत; वेश्या व्यवसायावर टाकला छापा, परराज्यातील महिलेची सुटका अन् तिघांना अटक

बीड पुन्हा चर्चेत; वेश्या व्यवसायावर टाकला छापा, परराज्यातील महिलेची सुटका अन् तिघांना अटक

Raid on Prostitution Business in Beed : बीडमध्ये अनेक घटना वारंवरा घडत असतात. राज्यात बीड जिल्हा कायम चर्चेचा विषय झालेला असतो. आताही अशाच विषयाने पुन्हा चर्चा सुरू झील आहे. (Beed) येथील उच्चभ्रू वस्तीत सुरु असलेल्या वेश्‍या व्यवसायाचा अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने (एएचटीयु) पर्दाफाश केला. छापा टाकून पथकाने परराज्यातील पिडीत महिलेची सुटका करून तिघांना अटक केली.

या प्रकरणी दोघांना अटक करुन तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शकुंतला सुरेश राऊत (४०, रा. फ्लॅट नं. ०२, राम अंश अपार्टमेंट, इंडिया बँक कॉलनी, बीड), महेश मोहनराव चांदणे (वय ३३, रा. गया नगर, बीड) व मुमताज नासिर शेख (रा. गेवराई) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये आणखी काय काय उघड होतय अशा दिशेने तपास सुरु केला आहे.

जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीडमध्ये धुसफूस; आमदार सुरेध धसांनी घतेली मुख्यमंत्र्यांची भेट, पुन्हा धस-मुंडे संघर्ष

जालना रोडवरील इंडिया बॅंक कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरु असल्याची माहिती, अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्होगाडे यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकला असला एका महिलेच्या माध्यमातून परराज्यातील महिलेकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद (कोलकत्ता) येथील पिडीतेची कारवाईत सुटका करण्यात आली. पोलिसांनी शकुंतला राऊत, महेश चांदणे व मुमताज नासिर शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शकुंतला राऊत हिच्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. मुमताज शेख महिलांची व्यवस्था करत असे, तर दलाल महेश चांदणे त्याच्या रिक्षातून महिलांची ने-आण करीत असे, असं कारवाईत समोर आल आहे.

पोलिसांनी शकुंतला राऊत व महेश चांदणे यांना अटक केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत कारवाया झालेल्या आहेत. कारवाईत वर्षा व्हगाडे, संजय सुरवसे, अशोक शिंदे, प्रदीप येवले, अनिता माने, मनीषा खरमाटे यांचा सहभाग हेाता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube