तनपुरेंच्या निशाण्यावर CM फडणवीस; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता तरी..

तनपुरेंच्या निशाण्यावर CM फडणवीस; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आता तरी..

Prajkt Tanpure : राज्य सरकारच्या विविध विभागांद्वारे सुरू असलेल्या बांधकाम कामांचे सुमारे ८९ हजार कोटी रुपये शासनाने जुलै २०२४ पासून थकवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सुरू असलेली कामे थांबवण्याचा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे विकासकामांना थांबा लागणार का हा प्रश्न उपस्थित करत राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही. त्यात सुकाळ योजनांचा बोजा स्वार्थासाठी शासनाच्या तिजोरीवर ओढवून घेतला.

कर्डिलेंनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, विकास दाखवतो, आ. प्राजक्त तनपुरेंचे खुले आव्हान

आता विकासकामे बंद होण्याची नामुष्की सरकारवर येतेय, यातच त्यांचा फोलपणा लक्षात येतो. दावोसवारीचे गोडवे गाणे संपले असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी आता या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष द्यावे अशा शब्दांत माजी आमदार प्राजक्त तानपुरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये तनपुरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. पराभवानंतर आता पुन्हा एकदा तनपुरे मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न हाती घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला. राहुरी मतदारसंघातील पराभवाचा बदला घेत भाजप नेते शिवाजी कर्डिले विजयी झाले. यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित समस्या आणि विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. तर दुसरीकडे माजी आमदार प्राजक्त तनपुरेही मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. मतदारसंघातील प्रलंबित समस्या आणि विकासकामांच्याच मुद्द्यांवर त्यांनी सरकारला घेरण्याचे ठरवल्याचे दिसत आहे.

पराभवानंतर तनपुरे अन् वर्पे यांचा EVMवर संशय; निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube