गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार… शपथविधीपूर्वीच नवनिर्वाचित खासदार वादाच्या भोवऱ्यात

गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार… शपथविधीपूर्वीच नवनिर्वाचित खासदार वादाच्या भोवऱ्यात

Nilesh Lanke Gangster Gaja Marne Met : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके हे वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार लंक यांनी पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. दरम्यान, गजा मारणेने लंके यांचा यावेळी सत्कार केला. (Nilesh Lanke ) या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Gaja Marne ) मारणे हा कुख्यात गुंड आहे. त्याला पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये अटक झाली होती. लंके यांनी त्याची भेट घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कोण आहे गजा मारणे Gaja Marne विरोधात २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा : पण पोलिसांना पुरावा सापडला नाही!

गजानन मारणे याचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

लोकसभेत असा झाला विजय

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांना निलेश लंके यांनी पराभूत केलं आहे. या निवडणुकीत निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली आहेत. या चुरशीच्या लोकसभा निवडणुकीत 28 हजार 929 मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube