काका-पुतण्याच्या गुप्त भेटीमागे भगत पाटील कनेक्शन? ईडीची नोटीस येताच दुसऱ्या दिवशी गुप्त खलबत

काका-पुतण्याच्या गुप्त भेटीमागे भगत पाटील कनेक्शन? ईडीची नोटीस येताच दुसऱ्या दिवशी गुप्त खलबत

पुणे : सध्या राज्यभरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? काय चर्चा झाली असावी? काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादीही भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांमुळे कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. अशात आता या भेटीमागे भगत पाटील यांचे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. (Ajit Pawar and Sharad Pawar met in Pune the day after Jayant Patil’s brother Bhagat Patil received the ED notice)

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपसोबत जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांनी पुण्यात नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतली असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशात पाटील यांचे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. गत शुक्रवारीच त्यांना नोटीस आल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार-शरद पवार यांची भेट झाली. यावेळी स्वतः जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे याच नोटिसीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार-शरद पवार यांची भेट झाली असावी,  असं सांगितलं जात आहे.

जयंत पाटील सध्या कथित आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. यापूर्वी या प्रकरणात तब्बल 9 तास त्यांची चौकशी देखील झाली आहे. यानंतर आता जयंत पाटील यांचे निकटवर्तीय देखील ईडीच्या रडारवर आल्याचे सांगितले जात आहे. यात सध्याच्या घडीला त्यांचे बंधू भगत पाटील यांना नोटीस आली आहे. भगत पाटील हे मुंबईत हॉटेल व्यावसायिक आहेत.

याबाबत बोलताना जयंत पाटील काय म्हणाले?

या नोटिसीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधूंना ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीसंदर्भात त्यांना माहिती विचारण्यात आली आहे. एका कंपनीच्या बाबतीत साक्ष म्हणून त्यांना बोलवण्यात आलेआणि ते चार दिवसांपूर्वीच जाऊन आले, असाही खुलासा पाटील यांनी केला. तसंच अजित पवार-शरद पवार भेटीचा आणि जयंत पाटलांच्या बंधूंना आलेल्या ईडी नोटिसीचा काही संबंध आहे का? असे विचारला असता जयंत पाटील म्हणाले. त्याचा आणि बैठकीचा काही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube