अजित पवार विमान अपघात प्रकरणात होणार मोठा खुलासा, VSR कंपनी मालक रोहित सिंह CID कार्यलयात

Rohit Singh On Ajit Pawar Case  : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार

Rohit Singh On Ajit Pawar Case 

Rohit Singh On Ajit Pawar Case  : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी व्हिएसआर कंपनीसह या कंपनीच्या मालकावर अनेक गंभीर आरोप करत या प्रकरणात कंपनीच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

तर आता सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह (Rohit Singh) आज पुण्यातील सीआयडीच्या (CID) कार्यालयात पोहचले आहे. त्यांच्याशी आज अजित पवार (Ajit Pawar) विमान अपघाताबद्दल चौकशी केली जाणार आहे. रोहित सिंह यांनी भारत सोडल्याचा दावा करण्यात येत असताना रोहित सिंह यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यलयात अजित पवार विमान अपघात प्रकरणात दाखल झाले आहे. त्यामुळे आता सीआयडी चौकशीत रोहित सिंह काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

माहितीनुसार, पुण्याती सीआयडी कार्यलयात रोहित सिंह यांच्यासह व्हीएसआर कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांची देखील आज चौकशी होणार आहे. विमान अपघाताच्या संदर्भात सीआयडीकडून व्हिएसआर कंपनीला प्रश्नावली देण्यात आली होती.

तिलक – अभिषेक पैकी एक होणार बाहेर? उपांत्य फेरीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या-

28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं होतं. यानंतर या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक पुरावे देत हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे.

follow us