वीजबिल भरू नका, वायरमन आला तर माझं नाव सांगा; अजितदादांचा शेतकऱ्यांच्या पाठीवर हात…
Ajit Pawar : शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागचं वीजबिल देखील माफ केलं आणि पुढची वीज मोफत येणार आहे. त्यामुळं कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर बिल (electricity bill) भरू नका, त्याला माझं नाव सांगा, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं. ते आज दिंडोरी येथील जन सन्मान यात्रेच्या व्यासपीठावरून बोलत होते.
एका दिवसात किती वजन वाढू किंवा कमी होऊ शकतं?; मेडिकल सायन्स काय सांगत…
राष्ट्रवादी कॉंग्रेसची जन सन्मान यात्रा आजपासून सुरू झाली. या यात्रेच्या दिंडोरीमधील सभेला अजित पवारांनी संबोधित केलं. ते म्हणाले की, माझ्यासाठी जनता हीच देव आहे आणि तुमचं पाठबळ हीच खरी शक्ती आहे. आम्ही महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या. जनतेची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाहीत तर आम्ही जनसेवक आहोत, असं अजित पवार म्हणाले.
ते म्हणाले, राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळालं नाही, अशी ओरड सुरू केली. मात्र, आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापुढे कृषी वीज बिल भरावे लागणार नाही. एवढेच नाही तर आतापर्यंत थकबाकीची बिले भरण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या सौरपंप योजनमुळे यापुढं शेतकऱ्याना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. सौरऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता शेतकऱ्यांना सौरपंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देता येईल, याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला.
Turbo : थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादानंतर ‘टर्बो’ सिनेमा आता Ottवर! तारीख लिहून ठेवा
ते म्हणाले, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागचं वीजबिल देखील माफ केलं आणि पुढची वीज मोफत येणार आहे. त्यामुळं कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर बिल भरू नका, त्याला माझं नाव सांगा, असं अजितदादांनी सांगितलं.
कालच मी 6 हजार कोटींच्या फाईलवर सही केली…
पुढं बोलतांना ते म्हणाले की, माझ्या लाडकी बहिण ही योजना आम्ही तुमच्यासाठी केली आहे. माय माऊल्या स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करतात. पण, त्यांनाही वाटत असेल कुठंतरी जत्रेत जावं. काहीतरी घ्यावं. महिलांच्या या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजना आणली आहे. आया बहिणींनो, मावलीनो, तुमचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, हा अजितदादांचा वादा आहे. माझ्या माय-माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच मी 6 हजार कोटींच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय, असं अजित पवार म्हणाले.