Video : आमच्या योजनांना प्रचंड प्रतिसाद; विरोधक गडबडले, अजितदादांनी वाचली आरोपांची यादी
योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक गडबडले आहेत असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांच्या सगळ्यांचं प्रश्नांना उत्तर दिली

Mahayuti Joint Press Conference : विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार जरून आहे. परंतु, त्याला काही (Mahayuti) विषय आणि मर्यादा असायला हव्यात. आम्ही तिजोरी रिकामी केली असा आरोप आमच्यावर केला. (Ajit Pwar) परंतु, मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, सर्व योजनांचं नियोजन करूनच या योजना राबल्या आहेत. तसंच, लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक गडबडले आहेत असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांच्या सगळ्यांचं प्रश्नांना उत्तर दिली आहे. ते महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
तो ट्रेलर होता! खरा सिनेमा २० तारखेच्या आधी दिसेल; शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांचा मुश्रीफांवर वार
अनेक उद्योग व्यवसाय आमच्या सरकारने आणले आहेत. परंतु, विरोधकांकडून कायम आरोप होतो की उद्योग बाहेरच्या राज्यात गेले आहेत. परंतु, या आरोपांमध्ये तथ्य नाही. विरोधक फक्त नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत असा थेट आरोप अजित पवार यांनी यावेळी बोलताना केला आहे. तसंच, आम्ही फक्त काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे आम्ही आम्ही पुस्तीकेच्या माध्यमातून लोकांसमोर कामाचा लेखाजोखा मांडत असतो.