लाचखोर रामोडची बदली रोखण्यासाठी विखेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अंबादास दानवेंनी पुरावाच दाखविला !
Ambadas Danve On Radhakrishna Vikhe : आठ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्यातील आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड (Anil Ramod) हे सध्या कारागृहात आहेत. डॉ. रामोड यांच्या घरातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती सीबीआयने जप्त केली आहे. परंतु आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना घेरले आहे. रामोड यांना बदली होऊ नये, पुण्यातच एक वर्ष मुदतवाढ द्यावी, यासाठी महसूलमंत्री विखे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन शिफारस केली होती, असे सांगत दानवे यांनी थेट पुरावा दिला आहे. दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रच ट्वीटरवर टाकले आहे. (ambadas-danve-allegation-on-radhakrishna-vikhe-corrupt-officer-anil-ramod-to-stop-transfer)
दानवे यांनी व्वा रे व्वा विखे पाटील असे म्हटले आहे. मंत्र्यांनी रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. महसूल अधिकारी अनिल रामोड यांना पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते.
संजय राऊत हे ‘सिल्व्हर ओक’चे दलाल, शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल
१ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते, रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्यांना पदावर मुदतवाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होती, असे दानवे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/1672836350608027652?s=20
दानवे यांनी उघड केलेल्या पत्रानुसार रामोड हे पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून ऑक्टोबर २०२० पासून कार्यरत आहे. त्यांची मुले पुणे येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. त्यांनी मुलांच्या शैक्षणिक सोयीच्या दृष्टीने सध्याच्या ठिकाणी एक वर्ष मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंती केलेली आहे. रामोड यांना पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत, असे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आजच थांबवा तुमच्या ‘या’ सवयी; नाहीतर आणखी वाढू शकते पोटाची चरबी
विखे यांचे पत्र दानवे यांनी सार्वत्रिक केले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून विखे यांना अडचणीत आणण्यात येत आहे. त्यावर अद्याप विखे यांनी उत्तर दिलेले नाही.