राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय; सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा होणार
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासासाठी आज चार मोठे
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासासाठी आज चार मोठे निर्णय घेण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत गृह विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वस्त्रोद्योग विभाग आणि विधि व न्याय विभागासाठी निर्णय घेतले आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या बैठकीत राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले बदल लक्षात घेऊन सुधारणा करण्यात येणार आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
याचबरोबर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना देखील राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सुरु करण्यात येणार आहे. तर एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यानुसार पालघर (Palghar) जिल्ह्याचा आता झोन-1 मध्ये समावेश करण्यात आला असून झोन-4 वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमातही बदल करण्यात येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
पालघर जिल्ह्यासाठी पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना होणार. सरकारी वकील कार्यालयांसह अनुषांगिक पदांच्या निर्मितीस मंजुरी. (विधि व न्याय विभाग)
नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना. (गृह विभाग)
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले बदल लक्षात घेऊन सुधारणा करण्यात येणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
लाडक्या बहिणींनो, खात्यात जमा होणार 3000? जाणून घ्या हप्त्याबाबत मोठी अपडेट-
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. पालघर जिल्ह्याचा आता झोन-1 मध्ये समावेश. झोन-4 वर्गवारी रद्द आणि विस्तारीकरण नियमातही बदल. (वस्त्रोद्योग विभाग)