‘राज’पुत्राला विजयी करण्यासाठी भाजपचा बडा नेता सरसावला; महायुतीच्या नेत्यांना करणार ‘ही’ विनंती

  • Written By: Published:
‘राज’पुत्राला विजयी करण्यासाठी भाजपचा बडा नेता सरसावला; महायुतीच्या नेत्यांना करणार ‘ही’ विनंती

Ashish Shelar on Amit Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यावेळी विधानसभेच्या मैदानात आहेत. ते माहीम विधासभेतून उमेदवार आहेत. दरम्यान, अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी नसेल. (Amit Thackeray ) कारण या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, आता या राज’पुत्रासाठी महायुतीत हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतय.

सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. मात्र, महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल. हिंदुत्वाची भूमिका घेणारे आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले असतील, तर आपणही नातं जपायला हवं. भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल तरी महायुतीने नातं जपावं, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं. त्यामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

माहीम विधानसभा राज साहेबांना भेट देणार; पहिल्याच प्रचार सभेत अमित ठाकरे जोरदार भाषण

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. महायुतीमध्ये एक नातं आपण जपायला हवं, असं मला वाटतं असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन (निवडून) देऊ असं मला वाटतय, असंही आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला

अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही?, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube