उपोषण करा पण फडणवीसांवर बोलताना सत्याचं परीक्षण करा; शेलारांचा जरांगेंना टोला
Ashish Shelar on Manoj Jarange for Criticize Devendra Fdanvis : मराठा आरक्षणाचा खून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी न्यायालयात बाजूच मांडली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांनी उपोषण करावं. मात्र देवेंद्र फडणवीस वर बोलताना सत्याचं परीक्षण करावं. मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि पवार-ठाकरेंवर अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. ते आजच्या भाजपच्या अधिवेशनात बोलत होते.
फडणवीसांचे आक्रमक भाषण; नेत्यांकडून कौतुकाची थाप, पदाधिकाऱ्यांचीही दाद
पुणे शहरातील बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचं अधिवेशनात दानवे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे उपमुिख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. या अधिवेशनात रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले म्हणून त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.
शेलार म्हणाले की, आपल्या मनासारखं यश आपल्याला मिळालं नाही. त्यातून कार्यकर्त्यांना आलेली मरगळ स्वाभाविक आहे. मात्र या लोकसभेत आपल्याला काही प्रमाणात अपयश मिळालं असले तरी सर्वजण एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकत नाही हे अधोरेखित झालं आहे. अतिआत्मविश्वास आणि अहंकारातून ठाकरे हे मोदींना इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी बोलवत होते. पवार हे देशात मोदी विरोधातील लाट असल्याचे सांगत होते. तर सकाळी नऊ वाजता बोलणारे पत्रकार पोपटलाल मोदी ब्रँड संपलाय. इंडिया आघाडीचे सर्व नेते त्यांची सत्ता येणार असे सांगत होते. मात्र भारतातील जनतेने मोदींना निवडून दिलं.
तसेच पुढे शेलार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या भूमिकेला भाजपचे समर्थन आहे. फडणवीस यांचा सरकार असताना आरक्षणाचा कायदा झाला. मात्र मराठा आरक्षणाचा खून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी न्यायालयात बाजूच मांडली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांनी उपोषण करावं मात्र देवेंद्र फडणवीस वर बोलताना सत्याचा परीक्षण करावं. एक बोट फडणवीसांकडे जात असेल तर चार बोटं ही ठाकरे आणि पवारांकडे जातात. त्यांचा बचाव करणारे उपोषण करते मराठा समाजाचे हित करत आहेत का? हा प्रश्न मराठा समाजाला पडत आहे. असं शेलार म्हणाले.