शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही पण विधानपरिषद दिली तर…, बच्चू कडूंकडून भूमिका स्पष्ट
Bachchu Kadu On Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाकडून राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही
Bachchu Kadu On Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाकडून राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जोराने सुरु आहे. तसेच विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी बच्चू कडू आपला प्रहार जनशक्ती पक्ष देखील शिवसेनेत विलीन करणार असं देखील सांगितलं जात आहे. आज बच्चू कडू यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले की, मीडियाचे आभार त्यांनी मी विधानपरिषद उमेदवार होऊ शकतो हे तुम्ही चालवले मला देखील समजले आणि एकनाथ शिंदेंपर्यंत (Eknath Shinde) देखील पोहचले असेल. पण दुसऱ्या पक्षात आमदारकीसाठी जाणारा इतका मी नालायक नाही. आमच्या संघटनेत 1 लाख सभासद आहे, दिव्यांग सभासद आहेत. शिवसेना पक्षातून बंडखोरी करत प्रहार संघटना उभी केली होती. मी पूर्वीचा शिवसैनिक आहे.
शिंदेंनी मला उमेदवाारी दिली तरी दिव्यांगांचा, गरिबांचा सन्मान होईल. आम्ही शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही. आम्ही आमच्या अनेक मागण्या शिंदेसमोर ठेवणार आहोत. बच्चू कडूंच्या (Bachchu Kadu) प्रहारची युती मुद्यांवर आधारित असेल. शिवसेनेतून बाहेर पडून सतत लढत राहिलेला बच्चू कडू एकमेव आहे. काँग्रेस, शरद पवार यांच्यासोबतही बसलो पण तत्व सोडले नाही असेही यावेळी कडू म्हणाले. फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करु पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव आमच्यासाठी महत्वाचे आहे. शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितले.
विक्रम काकडे, झिशान सिद्दीकीसह ‘या’ नावांची चर्चा; विधानपरिषदेसाठी सुनेत्रा पवार कोणाला देणार संधी ?
तर एकनाथ शिंदेंमुळेच कृषीकर्ज माफी शक्य झाली आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळेच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरु झाला होता. मुस्लिम मते भाजपसोबत जाण्याने विधानसभेला माझा पराभव झाला. सत्तंतरावेळी घेतलेल्या भूमिकेमुळे मी बदनाम झालो असं बच्चू कडू म्हणाले. तसेच आम्ही पदासाठी युती करणारे नाही असेही या पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले.