मोठी बातमी! बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार; करणार शिवसेनेत प्रवेश

Bachchu Kadu :  राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज

Bachchu Kadu

Bachchu Kadu :  राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी रात्री बच्चू कडू यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती मात्र यावर बोलताना बच्चू कडू यांनी प्रहार संघटना कायम ठेवणार असल्याची माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांना मंत्रिपदासह शिवसेनेत (Shivsena) मोठी जबाबदारी देखील मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.  बच्चू कडू यांनी काल (29 एप्रिल ) मुंबईत पत्रकार परिषद घेत आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होताे. आज विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Elections) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज बच्चू कडू (Bachchu Kadu) शिवसेनेत प्रवेश करत विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल, परवा ज्या चर्चा झाल्या त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्या आहेत. बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहिल असं माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले.

पराभवानंतर झिशान सिद्दीकींना मोठा राजकीय दिलासा; राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत संधी

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 एप्रिल शेवटचा दिवस असून 4 मे पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे.

follow us