आणखी एक पोलीस अधिकारी अन् सायबर एक्सपर्ट CMO मध्ये; मुख्यमंत्री शिंदेंच्या डोक्यात नेमके काय?

आणखी एक पोलीस अधिकारी अन् सायबर एक्सपर्ट CMO मध्ये; मुख्यमंत्री शिंदेंच्या डोक्यात नेमके काय?

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले बाळसिंग राजपूत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राजपूत हे महाराष्ट्रात पोलीस दलातील सायबर एक्सपर्ट पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सायबरचे पहिले पोलीस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. (Bal Singh Rajput was appointed as OSD by Chief Minister Eknath Shinde on deputation)

औंध (सातारा) हे जन्मगाव असलेले राजपूत यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महाराष्ट्र पोलीस दलात उपअधीक्षकपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली, सोलापूर, महाराष्ट्र सायबर, मुंबई पोलीस या ठिकाणी सेवा बजावली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा स्थापन केलेल्या सायबर युनिटचे अधीक्षक म्हणूनही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या मुंबई पोलीस दलात गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त म्हणून ते कार्यरत आहेत.

Adani Group : हिंडेनबर्गनंतर OCCRP ने सादर केला रिपोर्ट; तीन तासांत 35 हजार कोटी स्वाहा!

दरम्यान, यापूर्वी आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांचीही मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते देखील सायबर एक्सपर्ट म्हणून ओळखले जात असून त्यांनीही सायबर गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. आता राजपूत यांच्या निमित्ताने दुसरे सायबर एकस्पर्ट आणि पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला; नागरिकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न

कोण आहेत ब्रिजेश सिंह?

ब्रिजेश सिंह हे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजेच 2014 ते 2019 अशी पाच वर्षे ते माहिती आणि जनसंपर्क खात्याचे महासंचालक होते. याशिवाय सायबर गुन्हे शाखेचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. मात्र 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे सरकारने त्यांची उचलबांगडी केली. त्यांची होमगार्डच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली. पण, शिंदे-फडणवीसांचं सरकार येताच त्यांची नियुक्ती थेट मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube