अहिल्यानगर गोमांस प्रकरणी एक जण ताब्यात; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मांडला होता ठिय्या
Beef Found In Ahilyanagar शहरात गोमांस आढळून आले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी गोवंश फेकणारा जेरबंद केला.

Beef Found In Ahilyanagar one Arrested after Hindutva Activists Aggressive : अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या नाल्यात मंगळवारी 16 सप्टेंबरच्या दिवशी गोमांस आढळून आले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी थेट रस्ता आडवत ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलिसांनी 06 तासाच्या आत गोवंश कत्तल करुन, कत्तलीतील मासाचे उर्वरीत अवशेष कोठला येथे फेकणारा आरोपी जेरबंद केला आहे.
गोवंश सहा तासाच्या आत जेरबंद
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ सुत्र हलविली. व्यावसायिक कौशल्याचा वापर करुन तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीती प्रमाणे गुन्ह्याचे ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी व त्या वरील दोन इसमांचा शोध घेतला. ही गाडी आरोपी तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर याची असल्याचे निष्पन्न झाले. त्याची चौकशी केली असता त्याने सांगीतले की, त्यांने दोन बैल गोवंश यांची राहते घरी कत्तल करुन, त्याचे मांस विक्री केले आहे. कत्तल केल्यानंतर कत्तलीतील वेस्ट मांस व अवशेष हे फेकून देण्याकरीता ओळखीचे दोन विधीसंघर्षीत बालक यांना मोपेड गाडी देवुन, त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले. हे वेस्ट मांस व अवशेष त्यांनी कोठला बस स्थानक रोड कडेला फेकुन दिले. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली मोपेड गाडी ताब्यात घेण्यात आली असून, विना नंबरची जुनी वापरती मोपेट गाडी रु. 40,000/- किमंतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
कुणाला अनुकूल तर कुणाला प्रतिकूल कसं आहे आजचं राशीभविष्य? जाणून घ्या…
नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या नाल्यात मंगळवारी 16 सप्टेंबरच्या दिवशी गोमांस आढळून आले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वाहतूक अडवली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार संग्राम जगताप ही घटनास्थळी दाखल झाले होते.गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या कत्तलखान्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यानंतर गोवंशीय जनावरांच्या कत्तलीवर लगाम बसला होता. अशातच गोरक्षकांकडूनही जनावरांची वाहूतक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात होती. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं.
बंजारा अन् वंजारी एकच! नवा वाद पेटताच धनंजय मुंडेंनी आपली बाजू सेफ केली…
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात कत्तलखाने बंद करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. अखेर कुरेश समाजाने गोवंशीय जनावरांची कत्तल करणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानतंर गोमांस बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, शहरातील मध्यवर्ती भागात कोठला परिसरातील नाल्यामध्ये गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आल्याने एकच खळबळ उडालीयं.
तुम्ही ब्रँड नाहीत, नरेंद्र मोदीच जगातला सर्वात मोठा ब्रँड; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं…
ज्या पद्धतीने गोमांस आढळून आले आहे, त्यानुसार पुन्हा एकदा अहिल्यानगर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल सुरु झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्ता अडवत आंदोलन केलंय. यावेळी खुद्द आमदार संग्राम जगताप यांनीही रस्त्यावर ठिय्या देत कत्तलखान्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, रस्ता अडवत रस्त्याच्या मध्येच ठिय्या आंदोलन केल्याने अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.