‘माहिती नसणं अन् जास्त बोलणं..,’ औरंगजेबाच्या वादंगानंतर भालचंद्र नेमांडेंचं विधान

‘माहिती नसणं अन् जास्त बोलणं..,’ औरंगजेबाच्या वादंगानंतर भालचंद्र नेमांडेंचं विधान

Bhalchandra Nemade : माहिती नसणं आणि जास्त बोलणं, याचं प्रमाण सध्या वाढलं असल्याचं विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. दरम्यान, बाजीराव पेशवा आणि औरंगजेबाबद्दल विधान केल्याने नेमाडे चर्चेत आले आहेत. त्यांच्या विधानानंतर भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नेमाडे आज मुंबईतील अधांतर नाटकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त बोलत होते. (bhalchandra nemade statement after aurangzeb debate there is too much talk without knowledge)

अनिल गोटेंनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावताच…दोन गट भिडले ! दादांचा गट पडला भारी

नेमाडे म्हणाले, माहिती नसणं आणि जास्त बोलणं, याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. यातून कसा मार्ग काढायचा हा एक प्रश्नच आहे. सध्या बकवास सुरु आहे त्यामुळे देश कसा चालतोय, हा प्रश्न पडल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच अधांतर हा दुर्मिळ ग्रंथ म्हणावा लागेल. कुठे तरी आपल्यात प्रत्येकात एक संस्कृती असते, जी नाटकात दिसते. जगात कॅपिटलीझम वाढलंय त्यामुळे वाटतं की पुढे काय होणार? सगळी कामं रोबोट करत आहे. यंत्र माणसांना संपवणार आहे. कलाकाराला जे कळतं ते भेसूर सूत्र जयंत पवार यांनी लेखात मांडल्याचं नेमाडेंनी सांगितलं.

चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणल्याचा कॉग्रेसला पश्चाताप होईल, किरेन रिजिजू यांची टीका

तसेच प्रत्येकाला आपल्या गावातील लोक जवळचे वाटतात. शहरात असं नाही, बाजूला कोण राहतं, हे आपल्याला पाच-पाच वर्षे कळत नाही. दुरावा वाढत जातो आणि शेवटी सगळं आपल्या घरापर्यंत देखील येतं. हे सगळं अधांतरमध्ये दिसत, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते नेमाडे?
नानासाहेब पेशव्यांना 8 ते 10 वर्षाच्या कोवळ्या मुली लागायच्या. तसेच दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला. औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता. औरंगजेबच्या दोन हिंतू राणींना काशी-विश्वेश्वर मंदिरातील पंडे यांनी मंदिराजवळील भुयारात नेऊन भष्ट केलं होतं. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं, असा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube